Agriculture Processing

अनेक शेतकरी शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. यामध्ये ते यशस्वी देखील होतात. असाच काहीसा प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. सध्या सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे.

Updated on 26 December, 2022 9:51 AM IST

अनेक शेतकरी शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. यामध्ये ते यशस्वी देखील होतात. असाच काहीसा प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. सध्या सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे.

असे असताना यापासून कवडा गावाच्या शेतकऱ्याने नवीन उपक्रम केला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळत आहे.

यामुळे या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले आहेत. कवडा गावातील शेतकरी निरंजन कुटे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी गट शेती करता एक एकर शेतात सोयाबीनची लागवड केली आणि उत्पादनही भरघोस मिळाले.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार, विमान प्रवासात घडला धक्कादायक प्रकार

त्यांना मात्र बाजार न मिळाल्याने त्यांनी सोयाबीन घरीच ठेवले. नंतर त्यांना पानी फाउंडेशनच्या वतीने सोयाबीन पासून पनीर आणि गुलाब जामुन निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी देखील यापासून गुलाबजामून आणि पनीरची घरीच निर्मिती सुरू करायचे ठरवले.

त्यांनी सोयाबीन दळून त्यानंतर त्यापासून गुलाबजामून तयार केले. तसेच सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजवून पनीर तयार केले. सध्या एक किलो सोयाबीन पासून 1200 ग्रॅम पनीर तयार केले जाते. हे पनीर 250 रुपये किलोप्रमाणे विक्री होते.

शेतकऱ्यांनो सौर शेतीत मोठी संधी, केंद्र सरकारचे २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट

यामुळे त्यांना यापासून चांगले पैसे मिळत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला फायदा झाला आहे. अनेकदा शेतकरी बाजार नसल्याने नाराज होतात. मात्र काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून पैसे कमवत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
विजेचे रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक
केळीच्या दरात मोठी वाढ, उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: Gulabjam Paneer made from Soybean, farmer millionaire..
Published on: 26 December 2022, 09:51 IST