Agriculture Processing

शेतकरी सध्या पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. तसेच स्वतःची कंपनी आणि इतर व्यवसाय देखील शेतकरी करू लागले आहेत. असे असताना आता उत्तर प्रदेशमध्ये तुळशीची लागवड करणारे शेतकरी आता स्वतःची कंपनी उघडणार आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

Updated on 07 September, 2022 5:27 PM IST

शेतकरी सध्या पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. तसेच स्वतःची कंपनी आणि इतर व्यवसाय देखील शेतकरी करू लागले आहेत. असे असताना आता उत्तर प्रदेशमध्ये तुळशीची लागवड करणारे शेतकरी आता स्वतःची कंपनी उघडणार आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

सरकारच्या मदतीने झाशीच्या गुरसराय ब्लॉकमध्ये शेतकरी एफपीओ योजनेअंतर्गत कंपनी स्थापन करणार आहेत. आत्तापर्यंत अनेक मोठ्या आयुर्वेदिक कंपन्या येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली तुळशी खरेदी करत आहेत, मात्र एफपीओ अंतर्गत कंपनी स्थापन केल्यानंतर शेतकरी स्वत: उत्पादनाची विक्री करतील.

तुळशीची लागवड करणारे पुष्पेंद्र यादव यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून झाशीतील शेतकरी तुळशीचे पीक घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. आतापर्यंत शेतकरी आपली पिकवलेली तुळशी आयुर्वेदिक कंपन्यांकडे घेऊन जात होते. या कंपन्या तुळशीवर थोडी प्रक्रिया करून बाजारात चढ्या भावाने विकतात.

... तर दंड भरावाच लागणार! सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय

कंपनी सुरू झाल्यानंतर शेतकरी स्वत: तुळशीचे पदार्थ बनवून विकतील. या कंपनीत संचालकही शेतकरी असतील, प्रवर्तकही शेतकरी असतील आणि कामगारही शेतकरी असतील. उल्लेखनीय आहे की झाशीच्या गुरसराय, बांगरा आणि मौरानीपूरमध्ये ५३५ हून अधिक शेतकरी तुळशीची लागवड करत आहेत.

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. यासंदर्भात अनेक योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे झाशीच्या शेतकऱ्यांनी तुळशीची लागवड सुरू केली आणि आज ते त्यातून भरपूर कमाई करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
'वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हेलपाटे घातले तरी त्यांचे पैसे येत नाहीत'
गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
Pune Rain Alert: मुसळधार! बारामतीमध्ये ढगफुटी, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला वाचवले..

English Summary: fate farmers changed cultivation Tulsi, start their own company
Published on: 07 September 2022, 05:27 IST