Agriculture Processing

सध्या शेतकरी पिकांच्या पेरणीच्या कामात गुंतले आहेत. बागायती क्षेत्रात हरभरा पेरणी ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतींचा वापर करावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 26 October, 2022 4:59 PM IST

सध्या शेतकरी पिकांच्या पेरणीच्या कामात गुंतले आहेत. बागायती क्षेत्रात हरभरा पेरणी ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान केल्यास शेतकऱ्यांना (farmers) अधिक उत्पादन (production) मिळू शकते. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतींचा वापर करावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महत्वाचे म्हणजे हरभरा पिकाचे (gram crop) मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक (Intercrop) घेता येते. यामधून तुम्हाला दुप्पट उत्पादन मिळू शकते.

हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन (४५-६० सेंमी खोल) पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन निवडा. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत पीक चांगले येते.

‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

हरभरा लागवड व्यवस्थापन

लागवडीपूर्वी (cultivation) जमिनीची २५ सेंमी खोल नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. जमिनीची कमीत कमी मशागत करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.

सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या

पद्धती

१) बागायती क्षेत्रात पाणी देण्याची सोय असल्यामुळे पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास अधिक उत्पादन (production) मिळते. कमी खोलीवर ५ सेंमी वर पेरणी केली तरी चालते. काबुली हरभऱ्याची पेरणी शेत ओलावून वाफशावरच करावी. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.

२) १० नोव्हेंबरनंतर पेरणी १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशिरा केल्यास उत्पादनात अनुक्रमे २७ ते ४० टक्के घट होते.

३) देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, तर दोन झाडांतील अंतर १० सेंमी ठेवावे. काबुली जातींकरिता दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी आणि दोन झाडांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

४) ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.

महत्वाच्या बातम्या 
थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका; भाज्यांचे दर तेजीत, जाणून घ्या किमती

English Summary: Farmers start sowing gram crop from date Get plenty produce
Published on: 26 October 2022, 04:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)