Agriculture Processing

काही वनस्पतींची लागवड (Cultivation of plants) शेतीच्या बांधावर करूनही चांगले उत्पादन घेता येते. अशाच एका वनस्पतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया, ज्यातून शेतकरी घरबसल्या कमाई घेऊ शकतील.

Updated on 07 September, 2022 4:42 PM IST

काही वनस्पतींची लागवड (Cultivation of plants) शेतीच्या बांधावर करूनही चांगले उत्पादन घेता येते. अशाच एका वनस्पतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया, ज्यातून शेतकरी घरबसल्या कमाई घेऊ शकतील.

कॅक्टस अर्थात निवडुंग वानस्पतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे आधुनिक शेती (agriculture) करणारे काही शेतकरी निवडुंगाच्या लागवडीतून अनेक पटींनी चांगला नफा कमावत आहेत. महत्वाचे म्हणजे देश-विदेशात या वनस्पतीला मागणी जास्त आहे.

केंद्र सरकारने आखली नवीन योजना; आता घरगुती गॅस मिळणार फक्त 600 रुपयांमध्ये

सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी उपयोगी

तेल, शॅम्पू, साबण आणि लोशन यांसारखी सौंदर्य उत्पादने (beauty products) निवडुंगापासून बनविली जातात. ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. निवडुंग लागवडीसाठी जास्त पाण्याची देखील आवश्यकता भासत नाही.

विशेष म्हणजे काही भागांमध्ये विशिष्ट प्रकारची निवडुंग जणावरांना उन्हाळ्यात खाण्यासाठी दिली जातात. यामुळे भारतात अनेक भागांमध्ये निवडुंगाची व्यावसायिक शेती (Commercial agriculture) करण्याच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.

शेतकऱ्यांनो काळजी करू नका; खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेत्यांविरोधात होणार कारवाई

निवडुंगाची रोपटी ५ ते ६ महिन्यांत पूर्ण विकसित होते. याची लागवड जून-जुलै ते नोव्हेंबर या काळात केली जाते. जर याची लागवड (cultivation) तुम्हाला तुमच्या शेतात करायची असेल तर यासाठी शेताची माती खारट (soil salty) असावी.

रोप योग्य प्रकारे तयार झाल्यानंतर, जेव्हा त्याचे रोप १ मीटर उंच होईल आणि ५ ते ६ महिने पूर्ण झाले असतील तेव्हा शेतकर्‍यांनी त्याची योग्य कापणी करावी. वाढत्या मागणीनुसार विकले जाईल. यातून तुम्ही लाखों रुपयांची कमाई घेऊ शकता. 

महत्वाच्या बातम्या 
केंद्र सरकारने सादर केला अहवाल; नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ
Ganesh Visarjan 2022: लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना 'हे' 12 नियम लक्षात ठेवा
शेतकरी मित्रांनो पुढील 2 महिन्यात करा 'या' पाच पिकांची लागवड; मागणी असणार जादा

English Summary: Farmers reap bumper profits planting cactus
Published on: 07 September 2022, 04:31 IST