Agriculture Processing

रब्बी हंगामातील जवस हे महत्वाचे तेलबिया पीक आहे. या शेतीचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी केला जातो. या पिकामध्ये 8 प्रकारची जीवनसत्त्वे खनिजे आहेत. यासह जवस हे अतिशय पौष्टिक मानले जाते.

Updated on 14 October, 2022 12:37 PM IST

रब्बी हंगामातील जवस हे महत्वाचे तेलबिया पीक (Oilseed crop) आहे. या शेतीचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी केला जातो. या पिकामध्ये 8 प्रकारची जीवनसत्त्वे खनिजे आहेत. यासह जवस हे अतिशय पौष्टिक मानले जाते.

विशेष म्हणजे जवसाच्या तेलामध्ये ५८ % ओमेगा-३, ओमेगा-६, कोलेस्ट्रेरॉलल आणि अँटिऑक्सिडंट आहेत. जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २०% खाद्यतेल म्हणून, तर ८०% तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी वापर होतो. यासह जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक देखील मानला जातो. दुहेरी फायदा होऊ शकतो. 

पेरणीची वेळ व अंतर

प्रथम जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर काडीकचरा वेचून घ्यावा. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरून मिसळा.

जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधवड्यात करावी. दोन ओळींतील ३० सेंमी किंवा ४५ से.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सेंमीपेक्षा अधिक खोल करू नये.

अधिक उत्पादनासाठी रोपांची संख्या प्रति हेक्टरी ४.५ ते ५ लाख असावी. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी ८ ते १० किलो प्रति हेक्टरी वापरा.

कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन

जवसाची सुधारित वाणे व त्यांची वैशिष्ट्ये

१) लातूर जवस-९३ : ९०-९५ दिवस कालावधी, ४० % तेलाचे प्रमाण असते, तसेच उत्पादन ८००-१६०० किलो/हेक्टर मिळते. या जवसाची जात लवकर तयार होते. कोरडवाहू लागवडीसाठी, मर, भुरी, अल्टरनेरीया अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस नियंत्रण करण्यास प्रतिकारकक्षम आहे.

२) एन.एल-९७ : ११५- १२० दिवस कालावधी, ४२ % तेलाचे प्रमाण असते, तसेच उत्पादन ६००-१२०० किलो/हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस ही जवसाची जात प्रतिकारकक्षम आहे.

३) एन.एल-२६० : १११-११५ दिवस कालावधी, ४३ % तेलाचे प्रमाण असते. उत्पादन १५००-१६०० किलो/हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस ही जात प्रतिकारकक्षम आहे.

४) शारदा : कोरडवाहूसाठी उत्तम आहे. १००- १०५ दिवस कालावधी, ४१ % तेलाचे प्रमाण असते. उत्पादन ८०० किलो/ हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम (Insect resistant) आहे.

सिंह, कन्यासह या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

बीजप्रक्रिया/ खत व्यवस्थापन :

1) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम लावावे.
2) रासायनिक तसेच सेंद्रिय खते जवसाच्या उत्पादनवाढीस महत्त्वाचे कार्य करीत असतात.
3) कोरडवाहू पिकासाठी, २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद संपूर्ण खत प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे.
4) बागायती लागवडीसाठी, ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र (३० किलो) + संपूर्ण स्फुरद (३० किलो) पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरीत अर्धी नत्र मात्रा (३० किलो नत्र) पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावी.
5) जवसाचे पीक पहिल्या ३५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली डवरणी करावी.

ही आंतरपीक घेतल्यास मिळेल दुप्पट उत्पन्न

१. जवस + हरभरा
२. जवस + करडई
३. जवस + मोहरी

महत्वाच्या बातम्या
रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
आता अपात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार; 9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटींचा निधी मंजूर
वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत; जाणून घ्या बाजार समितीतील बाजारभाव

English Summary: Farmers improved variety hemp cultivation benefit
Published on: 14 October 2022, 12:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)