Agriculture Processing

शेती आणि शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे उद्योग आहेत. आपल्याला माहित आहेच कि कृषी क्षेत्राचा जर व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी असल्याकारणाने अनेक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी यामध्ये संधी आहे. शेतीक्षेत्रातील उत्पादित मालाशी संबंधित देखील अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला उभारता येतात. असाच एक चांगला नफा देणारा व्यवसाय शेतकरी बंधू उभारू शकतात.

Updated on 20 September, 2022 2:55 PM IST

 शेती आणि शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे उद्योग आहेत.  आपल्याला माहित आहेच कि कृषी क्षेत्राचा जर व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी असल्याकारणाने अनेक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी यामध्ये संधी आहे. शेतीक्षेत्रातील उत्पादित मालाशी संबंधित देखील अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला उभारता येतात. असाच एक चांगला नफा देणारा व्यवसाय शेतकरी बंधू उभारू शकतात.

कारण आपल्याला माहित आहेच की शेतामध्ये पिकणाऱ्या भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण्याची सुविधा असणे खूप गरजेचे असल्याने कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळेच कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या लेखात या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Business Tips: स्वतःचा ब्रँड निर्माण करा आणि दुधापासून बनवा 'हे'पदार्थ आणि कमवा भरपूर नफा

 'कोल्ड स्टोरेज'चा व्यवसाय

 जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात असणाऱ्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून घेणे खूप गरजेचे आहे.त्यासोबतच तुम्ही राहत असलेल्या दहा ते पंधरा किलोमीटर पट्ट्यात कुठल्या प्रकारच्या फळांची व भाजीपाल्याचे उत्पादन होते तसेच दुग्ध व्यवसाय किती प्रमाणात आहे

किंवा एखाद्या मत्स्य किंवा चिकन किंवा मटण मार्केट इत्यादी गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासणे गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर कोल्ड स्टोरेजचा प्रामुख्याने उपयोग हा भाजीपाला व फळे तसेच इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने साठवता याव्यात व त्यात बऱ्याच दिवसापर्यंत टिकाव्यात यासाठी होतो.

बऱ्याचदा एखाद्या शेतमालाचे एकाच वेळी जास्त उत्पादन निघते व बाजारपेठेत भाव पडतात. परंतु कोल्ड स्टोअरेज असेल तर यामध्ये वस्तू साठवून ती टिकवून ठेवणे सोपे जाते त्यामुळे कोल्ड स्टोरेज हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

या व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फॅक्टरी लायसन्स, फायर अँड पॉल्युशन डिपारमेंट आणि हॉर्टिकल्चर बोर्डाचे परमिशन, जीएसटी नंबर आणि उद्योग रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.

नक्की वाचा:Superb Bussiness: शेतकरी बंधूंनो! अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, वाचा माहिती

 या व्यवसायाचे नेमके स्वरूप

 समजा तुम्हाला कोल्ड स्टोरेज उभारतांना त्याची क्षमता पाच मेट्रिक टन मालाची करायचे असेल तर त्यासाठी 50 ते 60 स्क्वेअर फुटांची जागा लागते व विजेचा पुरवठा हा 24 तास राहील हे खूप महत्त्वाचे असते. यासाठी तीनशे ते चारशे एचपी इलेक्ट्रिसिटी असणे गरजेचे असून यासाठी तुम्हालाहा ते बारा लाख रुपये खर्च येतो.

यासाठी तुम्हाला दहा ते बारा वर्कराची आवश्यकता असते. यामध्ये तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन भाड्याने तुमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतात किंवा स्वतःचे उत्पादन देखील ठेवू शकता. यामध्ये चांगली कमाई होते.

हा व्यवसाय थोडक्यात

1- व्यवसायासाठी लागणारे भांडवल- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये भांडवल लागते.

2- लागणारी यंत्रसामुग्री- या व्यवसायात प्रामुख्याने कोल्ड स्टोरेज यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासते व  यंत्रसामग्री तुम्हाला अडीच ते तीन लाख लाखापर्यंत मिळू शकते.

3- लागणारे मनुष्यबळ-व्यवसाय साठी तुम्हाला पाच ते सहा मनुष्यबळाची आवश्यकता असते.

4- ग्राहक कसे मिळवाल?- यासाठी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तुमचा कोल्ड स्टोरेजची  माहिती देऊ शकतात तसेच दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून स्टोरेज साठी माल भाड्याने शकतात. तसेच वेगवेगळे मॉल्स, भाजीपाला आणि फळे पिकवणारे शेतकऱ्यांकडून देखील ऑर्डर मिळू शकते.

नक्की वाचा:Agri Bussiness: कोंबडी खाद्याचा व्यवसाय करा आणि मिळवा दुप्पट नफा,वाचा सविस्तर माहिती

English Summary: cold storage bussiness is so profiable and give finacial stabilty to farmer
Published on: 20 September 2022, 02:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)