Agriculture Processing

पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराची शेती केली जाते. असे असले तरी यामध्ये शेतकऱ्यांना हवे असे पैसे मिळत नाहीत. आता मात्र यामध्ये मोठा बदल होणार आहे. अंजिरला GI-टॅग मानांकन मिळाल्याने या फळाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated on 22 May, 2022 2:28 PM IST

पुणे पुरंदर आणि जेजुरी परिसरात आपण अनेकदा बघत असाल की रोडवर अनेक शेतकरी अंजीर विकत असतात. पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराची शेती केली जाते. असे असले तरी यामध्ये शेतकऱ्यांना हवे असे पैसे मिळत नाहीत. आता मात्र यामध्ये मोठा बदल होणार आहे. अंजिरला GI-टॅग मानांकन मिळाल्याने या फळाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यामुळे पुरंदर तालुक्यातील 13 शेतकर्‍यांनी मिळून अंजिरला आंतरराष्ट्रीय बाजारात (international market export fig) पोहोचवले आहे. काही दिवसांपूर्वीच पुरंदरमधून अंजीर जर्मनीला निर्यात करण्यात आली.तसेच पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी (PHFPC) ची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी व्यवसायिक पद्धतीने जानेवारी 2023 पासून माल पाठवण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगले दिवस बघायला मिळणार आहेत.

तसेच हे फळ जास्त टिकवण्यासाठी यांनी आधुनिकतेची जोड देत पॅकिंगमध्ये गुणवत्ता वाढवत संशोधन करून जागतिक बाजारपेठेत अंजिरसाठी जागा निर्माण केली आहे. यामुळे आता हे फळ लवकर खराब देखील होणार नाही. यामुळे त्याची गुणवत्ता तशीच टिकून राहणार आहे. महाराष्ट्रात 400 हेक्‍टरवर अंजिराची लागवड करून सुमारे 4300 मेट्रिक टन ताजे अंजीर तयार केले जाते. यापैकी 92 टक्के अंजीर पुरंदरमध्ये उत्पादित होतात.

लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, खरेदीला गेलं की ५० ला एक, कसा घालायचा मेळ

यशस्वी पॅकहाऊस टेस्टमुळे पुरंदरचे अंजीर जगातील कोणत्याही बाजारपेठेत पोहोचू शकेल असा विश्वास उत्पादकांना मिळाला आणि त्यानुसार टेस्ट केलेला अंजीर जर्मनीला पाठवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी 'सुपर फिग' नावाचा अंजीरांचा ब्रँड विकसित केला आहे. आता जहाजामार्गे हॅम्बुर्ग, जर्मनी येथे पाठवलेल्या अंजिराची टेस्ट यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर अंजीर चांगल्या स्थितीत परदेशी बाजारपेठेत पोहोचले असून खरेदीदारांनी त्याला चांगली पसंती दिली आहे.

'त्या' लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द!! सरकारकडून मोठी घोषणा, वाचा नवीन नियम

यामुळे आता येणाऱ्या काळात अंजिराला चांगले दिवस येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. PHFPC ही केंद्र सरकारची मान्यताप्राप्त स्टार्ट-अप कंपनी असणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील अंजीर हे थेट सातासमुद्रापार पाठवले जाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये अंजिरचे पीक घेतले जाते. तेथून ते निर्यात केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता शेती परवडणार!! शेती परवडत नाही म्हणून पठ्ठ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये
महत्वाची बातमी! आता वाहतूक पोलिस वाहन चालकांना थांबवून तपासणी करु शकणार नाहीत, वाचा नवा नियम
नाथाभाऊंनी करून दाखवले!! 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन..

English Summary: 13 farmers' revolution, fig eating price in international market, farmers will become millionaires ...
Published on: 22 May 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)