1. इतर बातम्या

शेतकरी दादांनो! शेतजमीन मोजणी करायची आहे का? अशाप्रकारे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर अर्ज प्रक्रिया

बर्याचदा शेत जमीन मोजणी करण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर येतो. ही शेतजमीन मोजणी करण्यामागे बरीचशी कारणे असतात. कधीकधी शेताच्या हद्दी बाबत शंका निर्माण होते किंवा बांधावर अतिक्रमण इत्यादी कारणांमुळे शेत जमीन मोजणी ची आवश्यकता भासते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the application process of land counting at bhumi abhilekh department

the application process of land counting at bhumi abhilekh department

 बर्‍याचदा शेत जमीन मोजणी करण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर येतो. ही शेतजमीन मोजणी करण्यामागे बरीचशी कारणे असतात. कधीकधी शेताच्या हद्दी बाबत शंका निर्माण होते किंवा बांधावर अतिक्रमण इत्यादी कारणांमुळे शेत जमीन मोजणी ची आवश्यकता भासते.

सातबार्यावर असलेल्या क्षेत्रापेक्षा प्रत्यक्षात मात्र तितके क्षेत्र दिसत नाही. त्यामुळे शेजारच्‍या शेतकर्‍याने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं की काय अशी शंका  मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शासकीय पद्धतीने मोजणी करणे हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर असतो. या लेखामध्ये आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करायची प्रक्रिया व लागणारी कागदपत्रे तसेच शेत जमीन मोजणी प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क याबद्दल माहिती घेणार आहोत.

 शेत जमीन मोजणी साठी अर्ज

 शेताच्या हद्दी च्या बाबतीत काही प्रश्न निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उपाध्यक्ष भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात. शेतजमीन मोजणी अर्जाचा नमुना हा  bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 अर्ज करण्याची प्रक्रिया

1- मोजणीसाठी अर्ज असे या अर्जाचे शीर्षक असून यामध्ये सुरुवातीला तुम्हाला कोणत्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकायचा आहे.

2- त्यानंतर पहिल्या पर्यायपुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता या विषयी माहिती भरायची आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे गावाचे नाव तसेच तालुका आणि जिल्ह्याचे नाव लिहायचा आहे.

3-त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय येतो. यातील मोजणीच्या प्रकार समोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे. त्यापुढे तालुक्याचे नाव, गावाचे नाव आणि शेत जमिनीचा गट क्रमांकात येतो तो  गट क्रमांक टाकायचे आहे.

4- तिसरा पर्याय हा सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी शुल्काची रक्कम हा येतो. या पर्यायात मोजणी फी ची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीच चलन  किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.

5- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फी ही तुम्हाला किती क्षेत्राची मोजणी करायची आहे व किती कालावधीमध्ये करून घ्यायचे आहे यावरून ठरत असते.

6- जमिनीच्या मोजणी चे तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला प्रकार हा साधी मोजणी म्हणजे याचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे. दुसरा प्रकार हा तातडीची मोजणी असून यामध्ये मोजणी कालावधी तीन महिन्याचा तर अति तातडीची मोजणी ही दोन महिन्याच्या आत केली जाते.

7- एक हेक्‍टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असेल तर एक हजार रुपये, तातडीची मोजणी करायची असेल तर दोन हजार रुपये तर अति तातडीची मोजणी साठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाते.

8- त्यानुसार शेतकरी मोजणी कालावधी ठरवून त्यानुसार कालावधी या कॉलममध्ये तशी माहिती भरू शकतात.

9- त्यानंतर उद्देश या पर्याय समोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश द्यायचा आहे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शेतजमिनीचे हद्द जाणून घ्यायची आहे का किंवा तुमच्या शेताच्या बांधावर अतिक्रमण कोणी केला आहे का? हे जाणून घ्यायचा आहे असा आपला उद्देश शेतकरी या समोर लिहू शकतात.

10- त्यानंतर चौथा पर्याय हा सातबारा उतारा प्रमाणे जमिनीचे सह धारक म्हणजे ज्या गट क्रमांकाचे मोजणी आणायचे आहेत या क्रमांकाचा सातबारा उतारा एका पेक्षा अधिक जण यांच्या नावावर असेल तर त्यांची नावे, त्यांचे पत्ते आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांचे संबंधित आहे, अशा प्रकारच्या संमतीदर्शक सह्या  आवश्यक असतात.

11-पाचव्या पर्यायामध्ये लगतचा कब्जेदार यांची नावे आणि पत्ता लिहायचा आहे. या तुमच्या शेताच्या चारही बाजूला ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या त्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ते त्या त्या दिशे समोर लिहायचे आहेत.

12- सगळ्यात शेवटी सहवा पर्याय आहे व त्यामध्ये अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची प्रमाण दिलेले आहे.

 अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे

1- शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी पिकाचे चलन किंवा पावती, तीन महिन्याच्या आतील सातबारा ही कागदपत्रे प्रमुख्याने लागतात.

2- जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनी व्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता जसे की,घर,उद्योगाची जमिनींची मोजणी करायची असेल किंवा अगदी निश्चित करायचे असेल तर तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.

3- ही सगळी माहिती भरुन झाल्यानंतर कागदपत्रांसह मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे

4- हा अर्ज कार्यालयात जमा केल्यानंतर तो ई-मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणी साठी किती फी लागणार आहे याचे चलन जनरेट केले जाते.

ही रक्कम स्वतः शेतकऱ्यानेबँकेत भरायचे असतं. त्यानंतर जमीन मोजणी चा रजिस्ट्रेशन नंबर तिथे तयार होतो त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोच दिली जाते. या पोस्टमध्ये मोजणी कुठल्या तारखेला होणार ती तारीख, मोजणी करायला येणारा कर्मचारी त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक यांची माहिती दिलेली असते.

( लक्षात ठेवावे वरील प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीचे आहे )(स्रोत-BBCNewsमराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:सोने-मोतीला मिळत आहे सोन्यासारखा भाव! हमीभावापेक्षा चार पट अधिक भाव, जाणून घ्या या वाणाची वैशिष्ट्ये

नक्की वाचा:नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूषखबर! प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान देण्याची प्राथमिक अंमलबजावणी सुरू

नक्की वाचा:नोकरी ही मिळेल अन जीवनसाथी शोधण्यास देखील होईल मदत! कर्मचार्यांना मदत करणारी 'ही' आहे अनोखी कंपनी

English Summary: the application process of land counting at bhumi abhilekh department Published on: 10 May 2022, 11:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters