1. इतर बातम्या

नोकरी ही मिळेल अन जीवनसाथी शोधण्यास देखील होईल मदत! कर्मचार्यांना मदत करणारी 'ही' आहे अनोखी कंपनी

मुलांमध्ये नोकरी आणि त्यानंतर लग्न हा ट्रेंड समाजात आहे. परंतु सध्या एकंदरीत समाजाची परिस्थिती पाहिली तर मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे म्हणजे फार महाकठीण काम झाले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is amazing company give job and do help to search lifepartner to employes

this is amazing company give job and do help to search lifepartner to employes

 मुलांमध्ये नोकरी आणि त्यानंतर लग्न हा ट्रेंड समाजात आहे. परंतु सध्या एकंदरीत समाजाची परिस्थिती पाहिली तर मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे म्हणजे फार महाकठीण  काम झाले आहे.

पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या असून लग्नाच्या बाबतीत बऱ्याच  अशा समस्या निर्माण होत आहेत. तसेच नोकरी मिळणे देखील  पाहिजे तेवढे सोपे नाही. शिक्षण घेऊन देखील वेळेवर चांगली नोकरी मिळेल त्याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. म्हणजे एकंदरीत पाहिले  तर नोकरी आणि लग्न या टप्प्यावर तरुणाची मोठ्या प्रमाणात  तारांबळ उडत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु आता या सगळ्या समस्या वर एका कंपनीने उपाय काढला असून ही कंपनी मला चांगली नोकरी तर उपलब्ध करून तेथेच शिवाय तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर शोधून देण्यात देखील मदत करते. विशेष म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या पगार मध्ये वाढ देखील ती कंपनी देते. या लेखात आपण या कंपनीची माहिती घेऊ.

 ही आहे अनोखी कंपनी

 मीडिया रिपोर्टनुसार, ग्लोबल टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी श्री मूकाम्बिका इन्फो सोल्युशन्स आपल्या अविवाहित कर्मचाऱ्यांना त्यांचा लाईफ पार्टनर शोधण्यासाठी मदत करते.

 राज्यातील मदुराई येथील शाखेत  कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष सुविधा सुरु केली असून या कंपनीची स्थापना 2006 मध्ये शिवकाशी येथे सुरू झाली होती. त्यानंतर या कंपनीने 2010 मध्ये मदुराई मध्ये आपली नवी शाखा सुरू केली. दुसऱ्या कंपनीचा वार्षिक टर्न वर पाहिला तर तो शंभर कोटींच्या घरात आहे.

 याबाबतीत कंपनीच्या सीईओ यांचे म्हणणे

 याबाबतीत कंपनीचे सीईओ सेलवागणेश यांनी सांगितले की सुरुवातीला कंपनीला कर्मचारी शोधण्यासाठी अडचणी आल्या. त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्याबाबत प्लॅनिंग केला व तसं काही खास सुविधा सुरू केले. त्यामुळे कंपनीला चांगले स्टाप मिळाला व कंपनीची कामगिरी सुधारली. आमचा आणि कर्मचाऱ्यांचा नातं एखाद्या कुटुंबात सारखा आहे कंपनीतील सगळे कर्मचारी मला मोठा भाऊ मानतात असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की कंपनीत काम करणारे सगळे एम्प्लॉईज गावातून दूरच्या ठिकाणहुन येतात. तसेच आई-वडील हे गावाकडे राहत असल्याने त्यांना लग्नासाठी जोडीदार शोधणे मध्ये खूप अडचणी निर्माण होतात. त्यावेळी आम्ही अलायन्स मेकर्स च्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांसाठी वधू-वर शोधण्यास मदत करतो.

या लग्नात कंपनीतील सर्व कर्मचारी जातात व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लग्न होताच संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढवला जातो असे देखील सेलवागणेश यांनी म्हटले.(स्रोत-tv9मराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Cyclone Update: 'असनी' या चक्रीवादळाचा पश्चिम बंगालसह आंध्र प्रदेश आणि ओडिशाला वादळी पावसाचा इशारा, महाराष्ट्रावर होईल का परिणाम?

नक्की वाचा:साखर आयुक्तांचा मायक्रो प्लान! अतिरिक्त ऊस गाळपासाठी साखर आयुक्तांनी बनवला हा मायक्रो प्लान

English Summary: this is amazing company give job and do help to search lifepartner to employes Published on: 09 May 2022, 12:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters