1. बातम्या

चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी

शेतकरी जोपर्यंत आपला माल तो स्वतः विकत नाही, तोपर्यंत तो फायद्यात येणार नाही, असे म्हटले जाते. असे असले तरी अनेकदा याला वाव मिळत नाही, यामुळे शेतकऱ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीमालाची उत्पादकता किती काढायची हे शेतकऱ्यांच्या नियोजनावर आणि अथक परिश्रमावर अवलंबून असले तरी शेतीमालाचे दर शेतकऱ्यांना ठरविता येत नाही. यामुळे शेती तोट्यात जाते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Chandrapur Farmers sell agricultural produce from malls

Chandrapur Farmers sell agricultural produce from malls

चंद्रपूर, शेतकरी जोपर्यंत आपला माल तो स्वतः विकत नाही, तोपर्यंत तो फायद्यात येणार नाही, असे म्हटले जाते. असे असले तरी अनेकदा याला वाव मिळत नाही, यामुळे शेतकऱ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीमालाची उत्पादकता किती काढायची हे शेतकऱ्यांच्या नियोजनावर आणि अथक परिश्रमावर अवलंबून असले तरी शेतीमालाचे दर शेतकऱ्यांना ठरविता येत नाही. यामुळे शेती तोट्यात जाते.

असे असताना काळाच्या ओघात (Market) मार्केटचा अचूक अंदाज आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उभारले जात असलेले मार्केट शेतकऱ्यांसाठी नवी आशा घेऊन येत आहे. यामध्ये अनेक शेतकरी पुढे येत असून अनेकांनी चांगले पैसे कमवले आहेत. असाच काहीसा प्रयोग चंद्रपूरमध्ये झाला आहे. चंद्रपुरात शेतकरी उत्पादित मॉलची सुरवात देखील झाली आहे.

यामाध्यमातून शेतीमालाची विक्री देखील सुरु झाली आहे. शहरातील तुकूम भागात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हे मॉल सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल करुन केवळ उत्पादनच वाढवले जाणार नाही तर आता उत्पादित झालेल्या मालाला चांगली बाजारपेठे मिळवून देण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांचा राहणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये अजून भर पडेल, असेही सांगितले जात आहे.

घर बांधायचे असेल तर करा घाई! लोखंड झालंय खूपच स्वस्त...

चंद्रपूर शहरात शेतीमालाचे मॉल उभारण्यात आले आहे. जिल्हाभरातील तालुक्याच्या ठिकाणी आणि इतर लहान मोठ्या शहरामध्येही शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बाजारपेठ निर्मितीची संकल्पना, चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे पाणी सर्वदूर पोहोचणार असल्याने अशा शेतकरी उत्पादित कंपन्यांची स्थापना करुन शेतकऱ्यांचे दिवस बदलतील अशी आहे आहे.

मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...

यामध्ये तांदूळ, हरभरा, हळद आणि तिखटसह विविध धान्यही देखील विक्रीसाठी आहेत. शेतीमालासाठी असे मॉल नव्यानेच झाले असून आता या ठिकाणी विषमुक्त उत्पादने विक्रीची सुवर्ण संधी राहणार आहे. यामुळे अशा बाजारपेठा भविष्यात वाढणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण, घटनेने राज्यात खळबळ
पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलन राज्यभर पसरले, आता क्रांती होणारच...
शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याबद्दल दादा तुमचे आभार

English Summary: market Chandrapur Farmers sell agricultural produce from malls, farmers traders Published on: 04 June 2022, 10:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters