1. इतर बातम्या

घर बांधायचे असेल तर करा घाई! लोखंड झालंय खूपच स्वस्त...

घराचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो, लोखंडी रॉड (Iron rod) हा एक महत्वाचा घटक यासाठी लागतो. घरांचे छप्पर, तुळई आणि स्तंभ इत्यादी बनवण्यासाठी बार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Iron has become very cheap

Iron has become very cheap

आपल्या हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे ते अनेकांना शक्य होत नाही. यामुळे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहते. असे असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. घराचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो, लोखंडी रॉड (Iron rod) हा एक महत्वाचा घटक यासाठी लागतो. घरांचे छप्पर, तुळई आणि स्तंभ इत्यादी बनवण्यासाठी बार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

असे असताना आता गेल्या काही दिवसांपासून बारांच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे, यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. 80,000 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे विकली जाणारी लोखंडी बार आता 60,000 रुपये क्‍विंटलपर्यंत घसरली आहेत. यामुळे घर बांधायचा विचार करत असाल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. या दराच्या घसरणीमागे एक कारण म्हणजे पोलादावरील निर्यात (Export duty on steel) शुल्क वाढवले ​​आहे.

त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टील उत्पादनांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये बारची किंमत 82 हजार रुपये प्रति टनावर गेली होती, जी आता 62-63 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. यामुळे जवळपास 20 ते 25 हजार रुपये कमी झाले आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील कर (Taxes on diesel and petrol) ही कमी केला आहे.

नितेश राणेंची मोठी घोषणा! बैलगाडा शर्यतीतील विजेत्याला देणार मर्सिडिज गाडी बक्षीस

यानंतर, देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती नियंत्रित करण्यासाठी त्याच्या निर्यातीवरील कर वाढवण्यात आला. ब्रँडेड बारच्या किमतीतही प्रति क्विंटल 5 ते 6 हजार रुपयांनी घट झाली आहे. सध्या ब्रँडेड बारची किंमतही 92-93 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. यामुळे यामध्ये देखील दिलासा मिळाला आहे. सध्या एकामागून एक, अनेक बड्या रिअल इस्टेट कंपन्या दिवाळखोरीत जात आहेत.

काय सांगता! चक्क 30 रुपयाला एक केळी, लाल केळी एवढी महाग का?

हे देखील एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे. तसेच पावसाळा सुरू होताच बांधकामाचे काम कमी होऊ लागते, त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणीही कमी होऊ लागते. बाजारात मागणी नाहीशी होताच, बारसह इतर बांधकाम साहित्याच्या किमती घसरायला लागतात. यामुळे यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
व्यापाऱ्यांनी कांदा विकला नाही, मग शेतकऱ्यांनी दाखवला हिसका, शेतकऱ्यांनो तुम्हीही करा असा प्रयोग
जागतिक पर्यावरण दिन 2022: पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन..
भारतीय गोवऱ्या पोहोचल्या जर्मनीत, लाखोंमध्ये मिळतेय ऑर्डर, एका गोवरीची किंमत तब्बल...

English Summary: If you want to build a house, hurry up! Iron has become very cheap ... Published on: 02 June 2022, 12:13 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters