Monsoon Update : हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी मान्सून (Monsoon Updates) वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. (Meteorological Department) देशभरातील शेतकरी (Farmer) आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत.
मान्सून बाबत हवामान खात म्हणतंय
राज्यात यंदा मान्सून (Monsoon) लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे.
पुढील 5 दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार आहे.
चिंता वाढली : कोरोना डोकं वर काढतोय, 24 तासांत 4270 नवे रुग्ण; 15 जणांचा मृत्यू
29 मे अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं रोजीचं केरळात प्रवेश केला होता. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळं तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala) पोहोचेल. असं भाकीत हवामान विभागानं केलं होते.
पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे.
Free Silai Machine Scheme: सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देतंय; आजच घ्या लाभ
उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
Published on: 05 June 2022, 03:49 IST