Weather

राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून 12 तारखेला तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Updated on 10 June, 2022 4:25 PM IST

राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून 12 तारखेला तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आता भारतीय हवामान विभागापाठोपाठ स्कायमेट (Skymet Weather Update) या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेने देखील मान्सूनचा (Mansoon Rain) आपला नवीनतम अंदाज सार्वजनिक केला आहे. स्कायमेंटने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर माहिती देतांना सांगितले की, मान्सून (Mansoon 2022) हा उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

मुंबईत 11 जून पासून मान्सूनच्या पावसाला (Mansoon Rain) सुरवात होणार असल्याचे भाकीत स्कायमेट ने वर्तवले असल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या जोमात खरीपाचे नियोजन करण्याला पुढे सरसावले आहेत.

मात्र स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेने यंदा सरासरीपेक्षा 37 टक्के कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र स्कायमेटच्या उलट यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचे भाकित वर्तवले आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यावर्षी मान्सून हा केरळ मध्ये 29 मे ला म्हणजेचं दरवर्षीपेक्षा दोन दिवस लवकरच दाखल झाला होता. यामुळे दरवर्षी सात जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी लवकर महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते.

मात्र मान्सून हा यंदा सात जूनला देखील दाखल झाला नाही. आता भारतीय हवामान विभागानुसार 12 जूनला मान्सून तळ कोकणात दाखल होणार आहे. शिवाय स्कायमेट नुसार उद्या पासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे निश्चितच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस लवकरच दिलासा मिळणार असल्याचे समजत आहे. 

दोन दिवसात कोकणात मोसमी पावसाची हजेरी

मित्रांनो सध्या महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांत पाऊस पडला आहे. याशिवाय आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अजून वाढणार असल्याचे सांगितले जातं आहे.

10 जूनपासून या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. स्कायमेटच्या नवीन अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत कोकणात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. कोकणात पोहोचतानाच दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही मोसमी पाऊस दाखल होणार असल्याचे स्कायमेटने सांगितले आहे.

English Summary: Skymet mansoon forecast release mansoon rain
Published on: 10 June 2022, 04:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)