Weather

Rain Update: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर धरणे शंभर टक्के भरली आहेत. काही भागात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Updated on 19 September, 2022 5:14 PM IST

Rain Update: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाचे (Heavy Rain) थैमान सुरु आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर धरणे शंभर टक्के भरली आहेत. काही भागात शेतपिकांचे (Damage to crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह (mumbai) अनेक जिल्ह्यांतही पाऊस पडत आहे. रविवारीही मुंबई महानगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. पावसामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला, तर आज मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अलर्ट जारी

महाराष्ट्रात या आठवड्यात सक्रिय मान्सूनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सोमवारी जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम येथे हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

इंजिनिअर दादा तुमचा नादच खुळा! मन की बात मधून प्रोत्साहित होत पिकवले ड्रॅगन फ्रूट; कमावतोय लाखों

मंगळवारसाठी जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ यलोमध्ये अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट राहील.

गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mahindra SUV: महिंद्राच्या 4 जबरदस्त एसयूव्ही कार बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज; या गाड्यांचा आहे समावेश

मुंबईतील सखोल भागात पाणी साचले

त्याचबरोबर मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रविवारीही हलका पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात लम्पीचा कहर! शेकडो जनावरांचा मृत्यू; सरकारकडून मिळणार मदत
शेतकरी आत्महत्या सत्र सुरुचं! पंतप्रधानांना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

English Summary: Rain Update: heavy rain in many districts of the state including Mumbai
Published on: 19 September 2022, 05:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)