Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) चक्र सुरूच आहे. दिवसांपासून संततधार पावसामुळे काही नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. तर काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) अजूनही सक्रिय आहे. अशा स्थितीत शुक्रवारीही राज्यात पावसाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. शुक्रवारी राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान केंद्र मुंबईने (Mumbai Weather Station) वर्तवला आहे.
पावसाच्या अंदाजानुसार हवामान खात्याने अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही पावसाची शक्यता आहे.
आला रे आला पंजाबरावांचा अंदाज आला; या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस...
यानंतर शनिवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त हिंगोली आणि नांदेडमध्येही हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मान्सून सुरू झाल्यानंतर पावसाची संततधार सुरू आहे.
पावसामुळे आतापर्यंत 125 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
Tomato Rate: टोमॅटो उत्पादकांचे येणार अच्छे दिन! दर पुन्हा कडाडण्याची शक्यता...
मुंबई हवामान
शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 43 वर नोंदवला गेला आहे.
पुणे हवामान
पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 52 नोंदवला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या:
नादच खुळा! 1.51 लाखाची बैल जोड; कामठीत बैलपोळा उत्साहात साजरा
Subsidy On Solar Pump: शेतकऱ्यांचा होणार फायदा! सोलर पंपावर मिळतेय 60 टक्क्यांपर्यंत अनुदान
Published on: 27 August 2022, 10:03 IST