जून महिना कोरडा काढल्यानंतर जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून अख्ख्या महाराष्ट्राला पावसाने धो धो धुतले. महाराष्ट्रातील संपूर्ण धरणे जवळजवळ तुडुंब भरली. तसेच या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान देखील केले.एवढा पावसाने कहर केल्यानंतर मागील नऊ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु परत एकदा पावसाने महाराष्ट्रात जोरदार आगमन केले असून सगळीकडे चांगला पाऊस पडत आहे.
जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नक्की वाचा:पुढील ३ दिवस पावसाचेच! या राज्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी
जवळ जवळ जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अढळ विश्वास असणारे महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.
काय आहे पंजाबरावांचा हवामान अंदाज?
पंजाब रावांनी जो काही हवामान अंदाज वर्तवला आहे त्यानुसार आज पासून राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून सात आणि नऊ ऑगस्ट दरम्यान राज्यातील जवळपास सगळ्याच ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळणार आहे.
नक्की वाचा:पुढील ४ दिवस या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर! IMD चा अलर्ट जारी
परंतु सात आणि आठ या दोन तारखांना महाराष्ट्रातील धुळे,जळगाव,नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 9 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
यासोबतच जर आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ त्यासोबतच मराठवाडा या विभागांना देखील नऊ तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
नक्की वाचा:IMD Alert: 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पुढचे आठ दिवस कोसळणार धो धो पाऊस
Published on: 07 August 2022, 11:56 IST