Weather

Panjabrao Dakh Havaman Andaj: पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आठ नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Updated on 05 November, 2022 10:52 AM IST

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आठ नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.

8 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सांगली, सातारा, सोलापूर आणि नांदेड या चार जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे.

खरीप हंगामातील पिकांची काढणी होत असताना पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढत आहे. शेतकरी बांधवांना या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

हेही वाचा: 52 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता मिळणार ही भेट!

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणाच्या जलाशयात वाढ झाली आहे, शिवाय नदी नाले आणि विहिरी देखील तुडुंब भरल्या आहेत.

हेही वाचा: बाप रे ! शेतकऱ्यांना चुना लावत पीक विमा कंपन्यांनी 5 वर्षात कमवला इतक्या कोटींचा नफा

यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान, राज्यात थंडीचा जोर देखील वाढत आहे. थंडीमुळे साहजिकच रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

हेही वाचा: परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट; आता...

English Summary: Panjabrao Dakh: Unseasonal rain will fall in four districts
Published on: 05 November 2022, 10:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)