Weather

Monsoon Update: राज्यातील मान्सूनच्या पावसाने सध्या तरी उघडीप दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तसेच सध्या जरी पावसाने मोकळीक दिली असली तरी १ सप्टेंबरपासून पुन्हा मौसमी पावसाला सुरुवात होणार आहे.

Updated on 28 August, 2022 10:02 AM IST

Monsoon Update: राज्यातील मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain) सध्या तरी उघडीप दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif season) शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तसेच सध्या जरी पावसाने मोकळीक दिली असली तरी १ सप्टेंबरपासून पुन्हा मौसमी पावसाला सुरुवात होणार आहे.

काही ठिकाणी अजूनही माध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. मुंबई आणि परिसरात अजूनही हलक्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळताना दिसत आहेत. राज्यात येत्या काही दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढच्या काही दिवस राज्यात पावसाची विश्रांती असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडं आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गट की ठाकरे गट घेणार? फडणवीस म्हणाले...

अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून (Department of Meteorology) करण्यात आलं आहे.

राज्यातील काही भागांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

LIC scheme: 10 लाखांची गुंतवणूक देईल 35 लाख रुपयांचा नफा; अशी करा गुंतवणूक...

यंदाच्या मान्सूनचा अधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागात शेतातील मातीही वाहून गेली आहे. तसेच राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. त्यातील जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे.

महत्वाच्या बातम्या:
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की नाही? सरकारने दिली माहिती...
"महाराष्ट्राच्या धर्तीवर खोके हराम नावाची संघटना, त्यात बोकेही आहेत"

English Summary: Monsoon Update: Heavy rain will fall again from September 1
Published on: 28 August 2022, 10:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)