Weather

मान्सून सक्रिय झाल्यानंतर त्याची वाटचाल जलद आणि विनाअडथळा सुरू होते परंतु अचानक ब्रेक लागला असून तेवीस तारखे पासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच अडकून पडला आहे.

Updated on 26 May, 2022 9:15 AM IST

मान्सून सक्रिय झाल्यानंतर त्याची वाटचाल जलद आणि विनाअडथळा सुरू होते परंतु अचानक ब्रेक लागला असून तेवीस तारखे पासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच अडकून पडला आहे.

परंतु आता वातावरण परिस्थिती पोषक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून येणारा 48 तासात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळावर  25 तारखेला म्हणजेच काल अपडेट करण्यात आले होते. त्यानुसार मान्सून दोन दिवसानंतर पुन्हा सक्रिय होऊन पुढे सरकेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील पाच दिवसात कोकण आणि गोवाराज्याच्या इतर भागात हलक्‍या ते मध्यम पाऊस पडू शकतो. असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मालदीव आणि कोमोरीन भागा सोबत बंगालच्या उपसागराच्या काही भागात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तसेच राज्यात देखील येणाऱ्या चार दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थानच्या उत्तर-पूर्व भागापासून  अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागापर्यंत कमी दाबाचा पट्टातयार झाला आहे.तसेच उत्तर पूर्व राजस्थान व बंगालच्या उपसागरात पर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय पट्टा तयार झाला असल्याने मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती तयार झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

तसेच मान्सूनच्या  प्रवासात अडथळे निर्माण होत असल्याने महाराष्ट्रातदोन दिवस उशिरा मान्सून दाखल होणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! 50 रुपये जमा करा अन मिळवा 35 लाख; वाचा सविस्तर

नक्की वाचा:Business: लाखोंची कमाई करायची आहे का? मग; सुरु करा 'हा' व्यवसाय अन कमवा बक्कळ

नक्की वाचा:Murah Buffalo: पशुपालकांनो! मुऱ्हा जातीची म्हैस इतर जातींच्या म्हशीपेक्षा कशी आहे वेगळी?मुऱ्हाम्हैस पालनातून होईल बंपर कमाई

English Summary: meterological department guess to will be coming two days pre mansoon rain in maharashtra
Published on: 26 May 2022, 09:15 IST