जुलै महिन्यामध्ये झालेल्या तुफान पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले व शेती पिकांचे अतोनात नुकसान देखील केली. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली तेव्हापासून चांगला पाऊस महाराष्ट्र मध्ये परत सुरुवात झाला होता मध्यंतरी दोन ते चार दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले असून आज कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तर मराठवाडा तसेच विदर्भामध्ये काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नक्की वाचा:IMD Alert: देशातील या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी
तसेच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनार्याजवळ शनिवारी जे काही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते ते रविवारी आणखी तीव्र झाले आहे.
तसेच मान्सूनचे आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान राज्यातील गंगानगर पासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागर पर्यंत कायम आहे.
नक्की वाचा:IMD Alert: देशातील या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी
मान्सूनच्या पावसाचा पश्चिम भाग हा सर्वसाधारण स्थितीत असून पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हा पाऊस होणार अशी शक्यता आहे.
या ठिकाणी आहे जोरदार पावसाचा इशारा
राज्यातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो ॲलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
Published on: 15 August 2022, 01:01 IST