या वर्षी मान्सून 6 दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल झाला असून 28 मे रोजी केरळात दाखल झाल्यानंतर ही पोषक स्थिती टिकून राहिली तर 6 जून रोजी मुंबईत तर त्याच्या पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच 11 जून पर्यंतमहाराष्ट्रातील विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातमान्सून धडकेला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर मागच्या वर्षीच्या विचार केला तर त्या तुलनेमध्ये या वर्षी दहा दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत मिळत आहे. मागच्या वर्षी खंड पडल्याने 10 जुलैपर्यंत या भागांमध्ये मान्सून ची वाट पाहावी लागली होती. जर आपण प्रतिवर्षी चा विचार केला तर देशामध्ये 22 मे रोजी अंदमानचा समुद्र आणि बेटावर मान्सून दाखल होतो, परंतु यावर्षी 16 मे लास दाखल झाला आहे त्यामुळे एक जूनला केरळात दाखल होणारा मान्सून 27 मे रोजीच केरळला येईल व पुढे एक जून पर्यंत कर्नाटक आणि सहा जून पर्यंत मुंबईचा समुद्र किनारा मान्सूनचे आगमन झालेले असेल. मुंबई नंतर पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये मराठवाडा ओलांडून उत्तर महाराष्ट्र, विदर्भा मार्गे मान्सून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधून मार्गक्रमण करण्याची संकेत आहेत.
जर यामध्ये हवामान विभागाच्या निरीक्षणाचा विचार केला तर केरळमध्ये 1 जून ला दाखल होणारा मान्सून 15 दिवसांमध्ये खानदेश, विदर्भामध्ये दाखल होतो. परंतु केरळ मध्येच यावर्षी चार दिवस आधी येत असल्याने खानदेशात मान्सून 11 जून पर्यंत येईल.
राज्यातील सध्या वातावरणीय स्थिती
जर आपण सोमवारचा विचार केला तर राज्यांमध्ये बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण होतेव त्यामुळे कमाल तापमानामध्ये घसरण पाहायला मिळाली.मराठवाड्यातील परभणी,औरंगाबाद, नांदेड आणि बीड या शहरांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने तापमानात वाढ झाली होती.
मात्र त्या तुलनेत यवतमाळ आणि अकोला हे विदर्भातील जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्येकमाल तापमानात घसरण झाली होती.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Published on: 17 May 2022, 08:53 IST