Weather

राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेली जनता सध्या मान्सूनची (Mansoon 2022) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मान्सूनचं महाराष्ट्रात नऊ तारखेला आगमन होणार असल्याचे सांगितलं होतं.

Updated on 04 June, 2022 11:03 AM IST

राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेली जनता सध्या मान्सूनची (Mansoon 2022) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मान्सूनचं महाराष्ट्रात नऊ तारखेला आगमन होणार असल्याचे सांगितलं होतं. 

मात्र आता महाराष्ट्रात मान्सून आगमन लांबणार असल्याचे सांगितले जातं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार आता मान्सून हा तब्बल एक आठवडा उशिरा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे राज्यातील जनतेस अजून काही काळ मान्सूनची आतुरतेने वाट पाहावी लागणार आहे.

मागील काही वर्षांचा मान्सूनचा (Mansoon Rain) अभ्यास केला असता हवामान तज्ञांना मान्सूनच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल आढळला आहे. यामुळे यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा दावा केला जात आहे. मान्सून जो की 9 तारखेला नागपुरात शिरकाव करणार होता तो मान्सून आता सोळा तारखेला महाराष्ट्र गाठणार आहे.

कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख 11 हजार रुपये; वाचा सविस्तर

यादरम्यान, मान्सूनचा पहिला पाऊस राज्यात केव्हा कोसळणार याबाबत भारतीय हवामान विभागाने कुठलीच स्पष्टता दिलेली नाही. मात्र असे असले तरी गेल्या काही दशकात मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे आणि यामुळे या वर्षी मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपर्यंत राज्यात 9 जून मान्सूनच्या आगमनाची वेळ गृहीत धरली जात होती. मात्र दहा वर्षांचा मान्सून चा अभ्यास केला असता केवळ तीनदा घडला आहे की मान्सून हा दहा जूनच्या आत महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

भारतीय हवामान तज्ञांच्या मते, मध्य भारतातील सर्व राज्यात मान्सून आगमनाची तिथी टळली असून या राज्यात मान्सून जवळपास एक आठवडा उशिरा दाखल होणार आहे. खरं पाहता मान्सून 9 जूनला नागपूर गाठणार असं छातीठोकपणे भारतीय हवामान विभाग सांगत होतं.

LPG Gas Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या नियमात झाला मोठा बदल, दरात झाली मोठी घसरण

मात्र आता बदललेली परिस्थिती लक्षात घेता आणि मान्सूनसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून नागपुरात 16 जूनला पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत काय नवीन मापदंडानुसार आता मान्सून आगमनाची तारीख 16 जून ठरवण्यात आली आहे. निश्चितच उकाड्याने हैराण झालेली जनता आणि खरीप हंगामासाठी लगबग करणाऱ्या बळीराजाला मान्सूनची अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

English Summary: Mansoon Rain: Oh my God! The arrival of monsoon in Maharashtra is long, the first rain of monsoon will fall on this date
Published on: 04 June 2022, 11:03 IST