Weather

सध्या भारतामध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वाढत असताना दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वार्याच्या आगमन होत आहे.

Updated on 16 May, 2022 9:12 PM IST

सध्या भारतामध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वाढत असताना दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वार्‍याच्या आगमन होत आहे.

अंदमान निकोबार मध्ये या वाऱ्यांचे  आगमन होऊन ते आता बंगालच्या उपसागरा पर्यंत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसात केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून धडकणार आहे. दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु या परिस्थितीत देखील उन्हाचा कडाका कायम राहणार असून तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. दक्षिण भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून संबंधित परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. सोबतच अंदमान निकोबार बेटावरील बहुतांश ठिकाणी नैऋत्य  मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून येऊन धडकला आहे.

 महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

 या सगळ्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राहणार असून या जिल्ह्यांमध्ये विजाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. येणाऱ्या काही तासामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. परंतु अकोला आणि अमरावती जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

अकोला जिल्ह्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:केंद्र सरकारच्या या योजनेत 10 टक्के रक्कम भरून घरी बसवा सोलर प्लांट, उर्वरित 90 टक्के रक्कम भरेल सरकार

नक्की वाचा:Positive News:अमरावतीसह समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्याच्या जवळून किंवा जिल्ह्यातून गेला आहे या जिल्ह्यांना मिळणार 'सीएनजी'

नक्की वाचा:गोड उसाची कडू कहाणी! एकीकडे ऊस तोडला म्हणून मिरवणूक तर दुसरीकडे गळ्याला फास

English Summary: mansoon enter in andamaan nicobaar island and next few days will be coming maharashtra
Published on: 16 May 2022, 09:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)