मान्सूनचा प्रवास हा अपेक्षेप्रमाणे होत असून सोमवारी म्हणजेच 13 जून रोजी मान्सूनने सकाळी सह्याद्री ओलांडून मराठवाड्यासह मध्यवर्ती भागाकडे झेप घेतली आहे.
त्यासोबतच कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास अपेक्षेइतका चालू असताना मात्र मान्सून कमकुवत असल्याने त्याचा जोर जरी कमी असला तरी 15 जून पर्यंत राज्यातील सर्वच भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महाराष्ट्रावर काळ्याकुट्ट ढगांची चादर पाहायला मिळत असून मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळत नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे. जर 15 जून म्हणजेच उद्याचा विचार केला तर मान्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाडा व दक्षिण मध्य प्रदेशाचा काही भाग व्यापणार आहे.
तर मान्सूनची दुसरी बंगालची उपसागरिय शाखा ही दोन दिवसात आंध्र प्रदेश, तेलंगणा ओलांडून ओडिषा, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे.
यापुढे दोन्ही शाखा एकत्रित एकमेकांना मिळून वाटचाल करण्याची शक्यता असून सोमवारी म्हणजेच काल कोकणात बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
तसेच आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज असल्याने वादळी वारे तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सध्या मान्सूनच्या सिमा
सध्या आपण मान्सूनच्या सीमेचा विचार केला तर ती दिव, नंदुरबार, जळगाव, परभणी, बिदर, तिरुपती, पुद्दुचेरी अशी आहे.
यामुळे मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी भाग, गुजरात राज्याचा काही भाग तर मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, मराठवाड्यासह कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा व तमिळनाडूचा काही भाग व्यापलेला आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या चोवीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच चोराच्या पश्चिमी वारे यामुळे येत्या चार दिवसात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नक्की वाचा:'या' तरुणाने घरीच बनवली लॅब अन पिकवले अविश्वसनीय भावात विकले जाणारे कार्डीसेप्स मशरूम
नक्की वाचा:'Anocovax' हे प्राण्यांवरील भारतातील पहिली कोराना लस लॉन्च, वाचा आणि घ्या संपूर्ण माहिती
Published on: 14 June 2022, 09:55 IST