Maharashtra Weather Today: यंदाच्या खरीप हंगामात (Kharif season) अनेक ठिकाणी मान्सूनचा (Monsoon) जोरदार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही पिके पाण्याखालीच आहेत. आता पावसाने उघडीप दिली असली तरी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाचा अंदाज पाहता हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही पावसाची शक्यता आहे.
त्याचवेळी, गुरुवारी राज्याच्या विविध भागात ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
याआधी मंगळवारीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.
धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या
प्रमुख जिल्ह्यांमधील हवामान
पुणे हवामान
पुण्यात कमाल तापमान 29 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 45 वर नोंदवला गेला आहे.
मुंबई हवामान
बुधवारी मुंबईत कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 35 वर नोंदवला गेला आहे.
Onion Price: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी! शेतकरी आक्रमक; सरकारकडे केली ही मागणी..
औरंगाबाद हवामान
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीतील 106 आहे.
नाशिक हवामान
नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत १२२ आहे.
नागपूर हवामान
नागपूरमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 92 आहे, जो 'समाधानकारक' श्रेणीत येतो.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! मुसळधार पाऊस थांबताच कपाशीवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव...
संकटांची मालिका संपेना! द्राक्ष लागवडीला कंटाळून शेतकऱ्याने १० एकर बागेवर फिरवला ट्रॅक्टर
Published on: 25 August 2022, 09:35 IST