Maharashtra Rain : राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आजही राज्यात जोरदार पावासाचा इशारा हवामान विभागानं (Meteorological Department) दिला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात देखील पावसानं हजेरी लावली.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, राजघराण्यावर शोककळा
आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर जिल्ह्यातही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जीवन प्रवास...
शेती पिकांना मोठा फटका
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी शेतीच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आणखी तीन चार दिवस पाऊस सक्रिय राहणार
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहणार आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Rain Updates: आताच सावध व्हा! पावसाबाबत मोठी बातमी आली समोर..
Published on: 14 September 2022, 08:50 IST