Weather

मागच्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकरी शेतातील कामे उरकून घेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.

Updated on 25 September, 2022 9:50 AM IST

मागच्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकरी (farmers) शेतातील कामे उरकून घेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.

26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज तर कोकणात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

कोकण विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

कोकणात आणि विदर्भात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात 26 सप्टेंबरला नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातुर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर करा हे काम

त्यामुळं नागरिकांना सावध राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देखील 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा (rain) अंदाज आहे तसेच अहमदनगरमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाख रुपयांचा नफा

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट (yellow alert) म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो.

हा इशारा वॉचसाठी (watch) दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

महत्वाच्या बातम्या 
कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..
पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन

English Summary: Maharashtra Rain Heavy forecast Yellow alert issued Vidarbha
Published on: 25 September 2022, 09:46 IST