राज्यात गेल्या आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक कडकानी जोरदार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश ठिकाणी काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे. आज कोकणात देखील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मात्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड तसेच महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा अर्थात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नक्की वाचा:Rain Update: पुणे वेधशाळेने पावसाबाबत दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा...
तसेच बाकीच्या विदर्भासह पूर्व मराठवाड्यातील विजांच्या कडकडाटासह पावसाची तर राज्याच्या बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज राज्यातील बऱ्याच ठिकाणी सूर्यनारायणाचे दर्शन झाले असून अहमदनगर, सोलापूर, जालना, बारामती आणि परभणी इत्यादी जिल्ह्यांमध्ये काय ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
राज्यात बऱ्याच ठिकाणी शनिवारपासूनच पावसाचा जोर कमी झाला असून नासिक आणि पालघर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.
नक्की वाचा:Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर
राज्यातील या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली, अकोला आणि गोंदिया त्या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यातील बुलढाणा, नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर इत्यादी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published on: 17 July 2022, 12:52 IST