Weather

सध्या जुलै महिन्यापासून ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे पावसाने थैमान घातले व सगळ्यात मोठा फटका बसला तो शेतकरी राजांना. अतोनात पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. परंतु आता या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून एक दिलासादायक बातमी येत असून ती म्हणजे, मध्यप्रदेश राज्य मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल परंतु फक्त पुणे घाटमाथ्यावर आज साठी ऑरेंज अलर्ट आहे.

Updated on 22 August, 2022 10:01 AM IST

नक्की वाचा:IMD Alert: विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; आज कुठे बरसणार पाऊस ?

परंतु हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की येत्या शुक्रवार नंतर राज्यातील पाऊस पूर्णपणे ओसरेल. तसे पाहायला गेले तर राज्यातील बहुतेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरला आहे.

 राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाचा इशारा

 परंतु महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्याच्या काही भागात येणारे दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नक्की वाचा:IMD Alert: सावधान! 'या' जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता; यलो अलर्ट जारी

या पार्श्वभूमीवर ठाणे, रत्नागिरी आणि नाशिक या ठिकाणी यलो अलर्ट तर पुणे शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, वाशिम, गडचिरोली आणि अकोला या भागांमध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट आहे.

परंतु 26 तारखे नंतर राज्यातून पाऊस पूर्णपणे ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी! जिल्हा बँक राज्य बँकेत होणार विलीन? केंद्र सरकारचे सहकार खाते त्या दिशेने

English Summary: indian meterological department give important update on rain in maharshtra
Published on: 22 August 2022, 10:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)