Monsoon News: राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईसह ठाणे (Mumbai) परिसरात पावसानं हजेरी लावली आहे.
हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
पश्चिम महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील दोन दिवस कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळ तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा: भारतातून पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटो निर्यात केला जाणार; बाजारभाव वाढणार...
Published on: 31 August 2022, 09:37 IST