Weather

IMD Alert: यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनच्या पावसाने अनेक भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तसेच काही भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिके नष्ट झाली आहेत. मात्र आता या महिन्यात परतीचा पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Updated on 03 October, 2022 11:51 AM IST

IMD Alert: यंदाच्या खरीप हंगामात (Kharip Season) मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) अनेक भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तसेच काही भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिके नष्ट झाली आहेत. मात्र आता या महिन्यात परतीचा पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळणार (Heavy Rain) असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे परतीच्या पावसाला विलंब लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर नोरू चक्रीवादळामुळे (Cyclone Noru) अनेक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळू शकतो त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू, चंदीगड, दिल्ली, जोधपूर येथून मान्सून परतला आहे. मान्सूनच्या या माघारीमुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) ढगाळ वातावरण राहील आणि मुसळधार किंवा रिमझिम पाऊस पडेल.

मोसंबी उत्पादक संकटात! मुसळधार पावसामुळे फळांची नासाडी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी परभणी, नांदेडसह विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, महाराष्ट्राच्या अनेक भागात आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच काही राज्यांमध्ये पावसाचीही शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमती 88.66 डॉलरवर; पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय झाला बदल; जाणून घ्या नवे दर...

मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, झारखंड, बिहारचा काही भाग, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारपट्टीचा कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, तामिळनाडूचा काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटे, रायलसीमा आणि काही भागात पावसाची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी वाढल्या! सोयाबीनच्या दरात मोठी घसरण
सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे दर...

English Summary: IMD Alert: Meteorological department issued yellow alert to these districts
Published on: 03 October 2022, 11:51 IST