भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आसनी चक्रीवादळाने त्याचा मार्ग बदलला आहे. आता ते काकीनाडा आणि विशाखापट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला स्पर्श करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर IMD ने आंध्र प्रदेशसाठी “रेड” अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे बुधवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ
आनंदाची बातमी : ट्रॅक्टर खरेदी साठी पाच लाख रुपयांचे अनुदान
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'आसानी' आता वायव्येकडे वेगाने सरकत आहे. ते आज आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
आज संध्याकाळपर्यंत, असनी उत्तर आंध्र प्रदेश किनार्यापासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल आणि नंतर उत्तर-पूर्वेकडे वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची दाट शक्यता आहे.
शेतजमीन मोजणी करायची आहे का? जाणून घ्या ! मोजणीची पद्धत
खरीप हंगाम : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय...
Published on: 11 May 2022, 12:07 IST