Weather

IMD Alert: राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आणखी काही दिवस परतीचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Updated on 30 September, 2022 11:49 AM IST

IMD Alert: राज्यात परतीचा पाऊस (Rain) धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मान्सूनच्या पावसामुळे (Monsoon Rain) खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आणखी काही दिवस परतीचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली त्यामुळे काढणीला आले सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात आजही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात परतीच्या मान्सूनला पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! प्रति बॅरल 76.77 डॉलरवर; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे भाव...

MD अलर्टनुसार, 4 ऑक्टोबरपासून बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाची सक्रियता दिसून येईल. मात्र, मान्सून लवकर निघताना दिसत आहे. एकाच देशात दोन हवामान यंत्रणा कार्यरत आहेत. ज्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर होत असून, हवामान खात्याने 17 राज्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तेलंगणा आंध्र प्रदेश लगतच्या कर्नाटकात गुरुवार ते येत्या शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, प्रत्यक्षात प्रशांत महासागरातून एक रेषा दक्षिणेकडील राज्ये ओलांडून पूर्वेकडील राज्यांकडे वळत आहे, त्यामुळे महाराष्ट्र केरळ कर्नाटक आसाम मेघालय मणिपूर नागालँड मिझोरम अरुणाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्य तामिळनाडू आंध्र प्रदेश झारखंड पश्चिम बंगालमधून जाणाऱ्या भागात पाऊस पडत आहे.

शेतकऱ्यांनो द्या लक्ष! गव्हाच्या या जाती एका हेक्टरमध्ये 96 क्विंटलपर्यंत देणार बंपर उत्पादन...

राज्यातील या भागांना अलर्ट

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यमहाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून या भागाला आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! ऑक्टोबरमध्ये मिळणार थकबाकीसह 4% वाढीव DA; जाणून घ्या किती पगार वाढणार
सोन्या-चांदीच्या किमतीत बदल; सोने 6197 रुपयांनी स्वस्त; फटाफट पहा नवे दर...

English Summary: IMD Alert: Heavy rainfall in these parts of the state
Published on: 30 September 2022, 11:49 IST