Weather

IMD Alert: देशात यंदा मान्सून वेळेवर सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामातील शेती कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Updated on 13 August, 2022 9:52 AM IST

IMD Alert: देशात यंदा मान्सून (Monsoon) वेळेवर सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामातील शेती कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मान्सून पुन्हा एकदा पूर्णपणे सक्रिय झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून पूरसदृश स्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) देशाच्या अनेक भागात आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा प्रवाह उत्तर-दक्षिण भारताकडे सरकत आहे. त्यामुळे मध्य भारतासह किनारपट्टी भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, यादरम्यान उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडू शकतो.

शेतीचा खेळखंडोबा! जूनमध्ये दुष्काळ, जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, शेतकरी उघड्यावर; नुकसान भरपाईची मागणी

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, आजपासून बंगालच्या उपसागरात आणखी एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाने राज्यात १५ ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनुसार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाची नवीन फेरी सुरू होऊ शकते.

या जातीच्या टोमॅटोला नाही रोगाचा धोका; लावा आणि कमवा बंपर नफा!

महेश पलावत म्हणतात की 'मान्सून ट्रफ' काही काळ उत्तरेकडे सरकेल आणि शनिवारपासून दिल्ली आणि इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या काळात फक्त किरकोळ दिलासा अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या:
पेट्रोल डिझेलवर दिलासा कायम! जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
कमी वेळेत मालामाल करणारी शेती! तोंडल्याच्या शेतीची ही खास पद्धत वापरा आणि कमवा बक्कळ पैसा

English Summary: IMD Alert: Heavy rain will fall in these states in the next few hours
Published on: 13 August 2022, 09:52 IST