IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर पावसाने (Rain) पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतपिके पाण्याखाली गेली आहेत तर काही भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसात पाणी साचल्याने वाहनांचा वेग ठप्प झाला. नागरिकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागला. पुण्यात (Pune) मुसळधार पावसामुळे मुळा मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर सखल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले.
सखोल भागात भरले पाणी
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, खडकवासला धरणातून २२८८० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसामुळे ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर काही रेल्वे रुळही पाण्याखाली गेले. पालघरच्या वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मुसळधार पावसाने पाणी साचले आहे.
खुशखबर! केंद्र सरकार पीएम किसान योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये; अशी करा नोंदणी
मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काही भागात पाणी साचणे आणि झाडे पडणे याशिवाय कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ते आणि खड्ड्यांची दुरवस्था झाल्यामुळे पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महिंद्राच्या या दमदार इलेक्ट्रिक कारमध्ये आहेत धमाकेदार फीचर्स; सिंगल चार्जमध्ये धावेल ४५० किमी
सापगाव पुलाजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्क केले
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ठाणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आरडीएमसीचे प्रमुख अविनाश सावंत म्हणाले की, घोडबंदर रोडवरील चितळसर पोलिस ठाण्यासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सापगाव पुलाजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.ठाणे शहरात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 66.28 मिमी पाऊस झाला, तर गेल्या एका तासात 22.86 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कुंडलिका, उल्हास आणि काळू नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे.
महत्वाच्या बातम्या:
कीटकनाशक कंपन्यांच्या जाळ्यात अडकले शेतकरी; भाजीपाला आणि फळे निर्यातीवर प्रभाव
सामान्य मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी; सरकारही देतंय 85 टक्के अनुदान
Published on: 17 September 2022, 09:16 IST