Weather

IMD Alert : देशात जोरदार मान्सून बरसताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही राज्यात मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Updated on 20 July, 2022 10:31 AM IST

IMD Alert : देशात जोरदार मान्सून (Monsoon) बरसताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही राज्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हवामान खात्याकडून (Department of Meteorology) करण्यात आले आहे.

एकीकडे देशात मुसळधार पाऊस पडत असताना दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 20 ते 23 जुलै दरम्यान दिल्लीत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 20 जुलैपासून म्हणजेच आजपासून दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दिल्लीत आजपासून तीन दिवस पाऊस पडू शकतो

IMD नुसार, आज दिल्ली NCR च्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत आजचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आजपासून तापमानात लक्षणीय घट होऊ शकते.

20 ते 23 जुलैपर्यंत तापमान 31 ते 33 अंशांच्या आसपास राहील. त्याचवेळी 24 पासून पुन्हा एकदा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सून ट्रफ पुढील तीन दिवस राजधानीच्या जवळपास राहील. त्यामुळे तापमानही कमी होऊन वातावरण आल्हाददायक राहील.

बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

पावसामुळे शाळांना सुट्टी

हवामान खात्याने वायव्य भारत, ईशान्य राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पुढील 3-4 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे डेहराडूनमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने बुधवारी राज्यातील १३ पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

'या' योजनेत दरमहिना फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा 5,000 रुपये पेन्शन

राजस्थान आणि महाराष्ट्रात पावसाचा इशारा

त्याचवेळी राजस्थानच्या अनेक भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात पावसाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मुसळधार पाऊस (Rain) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

पुढील २४ तासांत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

खासगी हवामान माहिती एजन्सी स्कायमेटने म्हटले आहे की, गुरुवारपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात मान्सूनचा वेग वाढेल, तर ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, किनारपट्टी कर्नाटक, मणिपूर, गुजरात, राजस्थानमध्ये पुढील २४ तासांत पाऊस पडेल. तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :
'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका
Tricky Questions: राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी कमाल आणि किमान वय किती आहे?

English Summary: IMD Alert: Heavy rain! Alert issued by IMD
Published on: 20 July 2022, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)