Weather

IMD Alert: यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नुसती हुलकावणी दिल्यामुळे अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Updated on 20 August, 2022 10:27 AM IST

IMD Alert: यंदा मान्सूनच्या (Monsoon) पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नुसती हुलकावणी दिल्यामुळे अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.

काही दिवसांपासून मुसळधार पावसापासून हलकासा दिलासा मिळाला होता, मात्र पावसाची शक्यता पाहता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणीसह गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने शुक्रवारी यलो अलर्ट जारी केला होता.

त्यामुळे शहरासह विविध भागात कुठेतरी संततधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे गोंदिया, नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये 20 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला असून, 21 ऑगस्टसाठी जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

Tractor Mileage: दर तासाला ट्रॅक्टर खातो इतके तेल; चांगल्या मायलेजसाठी करा हे काम; जाणून घ्या...

दरम्यान, संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 9-10 ऑगस्ट आणि त्यानंतर 14-15 ऑगस्टला अतिवृष्टीमुळे अनेक गावे पाण्याखाली गेली. त्यामुळे गावांचा तहसील मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

अनेक रस्तेही बंद झाले. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. हवामान उशिराने बदलले आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीसह घरांचे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्यापपर्यंत नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही.

खर्च एकदाच आणि आठमाही पैसाच पैसा! एकदा लागवड करा आणि 8 महिने वांग्याच्या शेतीतून मिळवा नफा

यावेळी खरीप हंगामातील जून महिना वगळता पावसाने जुलै महिन्यापासून दमदार हजेरी लावली आणि १५ ऑगस्ट रोजी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाने १२२०.३ मिमीचा आकडा ओलांडला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती.

महत्वाच्या बातम्या:
Gold Price Update: खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण; चांदी 1219 रुपयांनी घसरली..
Niger farming: टेन्शन कसलं घेताय! रामतीळ शेती करा आणि बना मालामाल; जाणून घ्या...

English Summary: IMD Alert: Beware! heavy rain in 'this' district; Yellow alert issued
Published on: 20 August 2022, 10:27 IST