यावर्षी पाऊस काहीसा उशिरा सुरु झाला, असे असताना आता मात्र राज्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु झाली आहे. कोकणात दमदार पावसाने सुरुवात केली असून या अनेक धरणे भरली आहेत. सध्या कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अधिकचा पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 30 अधिक धरणे ही ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पाऊस सक्रीय तर झाला आहे. यावर्षी पावसाने उशीर केला. तसेच अजूनही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला नाही. यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणीपुरठा होतो. या धरणातही सरासरी एवढा पाणीसाठा झाल्याने शहराला आता पाणीटंचाई भासणार नाही.
आता रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळ धरणासह परमेश्वर तालुक्यातील गडनदी, खेड तालुक्यातील नातूवाडी, राजापूर तालुक्यातल्या पूर्व भागातील अर्जुना धरण, लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणासह सर्वच धरणे भरली आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे शिवाय फळबागांनाही याचा मोठा आधार आहे. सध्या शेतकऱ्यांची भात लागवड सुरु आहे.
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
सध्या पाऊस सुरुच असून पावसामध्ये सातत्य आहे. कोकणावर पावसाची कृपा असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पाऊस नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
महत्वाच्या बातम्या;
बकरी ईद निमित्त ताजमहलमध्ये जाणारांसाठी आनंदाची बातमी, प्रशासनाचा निर्णय..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...
महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ! जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाच्या पक्षाला रामराम
Published on: 10 July 2022, 10:10 IST