Weather

सध्या राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवेळी बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Updated on 28 July, 2022 9:48 AM IST

सध्या राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवेळी बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा
Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना

पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही भागात तुफान पाऊस झाला तर नागपूरमध्येही पाऊस (rain) पडत आहे. अनेक भागात दमदार पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागात मेघगर्जनेसह तासभर पाऊस बरसला. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे ही वाचा 
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद

राज्यातील शेती पिकांना मोठा फटका

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे.

अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान (loss farmers) झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या 
Gas cylinder free: सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा तुम्ही आहात का लाभार्थी
Agriculture Officer: ...आणि कृषी अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला; वाचा नेमकं काय झालं
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: Heavy rain warning next two days Farmers may suffer
Published on: 28 July 2022, 09:47 IST