यावर्षी पावसाचा अंदाज चांगला वर्तवण्यात आला असून मान्सून देखील वेळेपेक्षा लवकर दाखल झाला असून कालच केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केला.
एक-दोन दिवस आगोदर श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सून अडकलेला होता मात्र तो काल रविवारी केरळ पर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असून ती म्हणजे आजपासून मराठवाडा विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषि मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 30 मे ते 1 जून दरम्यान वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आज नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली तर 31 मे व एक जूनला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ग्रामिण कृषि मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.कैलास डाखोरे यांनी दिली.
पुढच्या सात दिवसात महाराष्ट्रात होईल मान्सूनचे आगमन
मान्सूनचा केरळमध्ये दाखल झाला असून यावर्षी वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे.केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसांत तळ कोकणात दाखल होत असतो.
या वर्षी चार ते पाच जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज आहे.त्यानंतर तो मुंबई, पुणेअन्य ठिकाणी बरसणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये मान्सूनचा प्रवास काहीसा मंदावलेला असेल. त्यानंतर तो सर्वत्र चांगला प्रकारे पडेल अशी स्थिती दिसत आहे.
राज्यामध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील काही ठिकाणी पाऊस झाला असून मुंबईच्या परिसरात हलका पाऊस झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:लाल जर्दाळू:हिमाचलमध्ये लागवड करण्यात आलेला लाल जर्दाळु कॅन्सरशी लढण्यासाठी आहे उपयुक्त
Published on: 30 May 2022, 12:40 IST