Weather

सध्या मान्सूनमुळे वातावरणात कमालीचा बदल बघायला मिळत आहे. काल म्हणजेच गुरुवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जवळजवळ 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जरी केला.

Updated on 20 May, 2022 10:17 AM IST

सध्या मान्सूनमुळे वातावरणात कमालीचा बदल बघायला मिळत आहे. काल म्हणजेच गुरुवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जवळजवळ 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जरी केला. केरळमधील मुसळधार पावसामुळे हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी तिरुअनंतपुरम आणि कोल्लम वगळता केरळमधील उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ज्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे त्या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. केरळमधील कासारगोड, कन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पलक्कड, त्रिशूर, एर्नाकुलम, इडुक्की, पठानमथिट्टा, कोट्टायम आणि अलाप्पुझा या 12 जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शिवाय पुढील 48 तास खूप महत्वाचे आहेत. पुढील 48 तासात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ज्या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या भागात साधारण 6 ते 20 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. आणि जर 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असेल तर त्या भागात रेड अलर्ट जारी केला जातो, आणि 11 सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाची शक्यता असेल तर पिवळा अलर्ट जारी केला जातो. उत्तर तामिळनाडू आणि लगतच्या भागात चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे 'केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण' (SDMA) यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने झाला मोठा निर्णय

दरम्यान बुधवारी, केंद्रीय हवामान खात्याने पावसाबाबत पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात जनजीवन हे ठप्प झाले आहे. शिवाय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळाली आहे.

केरळमधील पावसाचे एकंदरीत वातावरण बघता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एक दिवस अगोदरच भूस्खलन आणि पूर यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी सज्जतेच्या सूचना जारी केल्या आहेत. मुसळधार पावसामुळे बरेच नुकसान होण्याची शक्यता आहे मात्र या सर्वांना
तोंड देण्यासाठी अधिकारी सज्ज रहावे म्हणून सज्जतेच्या सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

युरिया खत खरेदीसाठी नवा नियम लागू; तीन गोण्यांसोबत घ्याव्या लागणार "या" दोन बाटल्या

यामध्ये प्रामुख्याने स्थानिक महामंडळांनी त्यांच्या क्षेत्रातील आपत्ती प्रवण क्षेत्रांची यादी तयार करावी आणि ती पोलीस आणि अग्निशमन सेवा यांसारख्या संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. असे निर्देश देण्यात आले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ने आधीच पाच टीम तैनात केल्या आहेत.

'केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण' (SDMA) ने याबाबत काही सूचना जाहीर केल्या आहेत. पाऊस कमी होईपर्यंत नद्या आणि इतर जलकुंभांपासून नागरिकांनी दूर रहावे, तसेच डोंगराळ भागात जाऊ नका असंही सांगण्यात आले आहे. त्यासोबतच पाऊस कमी होईपर्यंत रात्रीचा प्रवास टाळावा असा सल्लाही देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
कांद्याचा वाद पुन्हा पेटला; सांगा कशी करायची शेती?

English Summary: Farmers take care; Heavy rains in these districts, NDRF team deployed
Published on: 20 May 2022, 10:17 IST