Weather

राज्यभरात परतीच्या पावसाने चांगलीच हजरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या कित्येक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जास्त करून भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला पिकांची काळजी कशी घ्यावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Updated on 20 October, 2022 9:56 AM IST

राज्यभरात परतीच्या पावसाने चांगलीच हजरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या कित्येक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जास्त करून भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला पिकांची (vegetable crops) काळजी कशी घ्यावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

पिकांप्रमाणेच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. याविषयी माहिती पाहूया.

सर्व पिकांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. शेतकऱ्यांनी (farmers) तूर पिकांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी.

रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा

तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करा.

टोमॅटो पिकावरील करपाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन (Azoxystrobin) 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान

काकडी सारख्या भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी (Displacement of insects) लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.ही फवारणी तुम्हाला पावसाचा अंदाज घेऊन करावी लागेल. अन्यथा कष्ट वाया जाईल. 

महत्वाच्या बातम्या 
सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणूक होण्याची शक्यता; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य
सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर
शेतकरी मित्रांनो गाय, म्हैस आणि शेळीच्या या जातींचं पालन करा; होईल मोठा फायदा

English Summary: crop damage return rains agriculture department tur vegetable crops
Published on: 20 October 2022, 09:52 IST