पुणे : राज्याच्या किमान तापमानात ढगाळ हवामानामुळे चढ-उतार होत आहे. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी गारठा मात्र कायम आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी महाराष्ट्राच्या अनेक भागांत धुक्याची चादर पाहायला मिळाली. आजपासून उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या अनेक भागांत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी (ता. ५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तर महाराष्ट्र गारठला
उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २१ अंशांच्या दरम्यान होता. आजपासून (ता. ६) राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होत थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत आहेत.
"शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक"
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. परिणामी, गेले अनेक दिवस तीस अंशांपार असलेला किमान तापमानाचा पारा २० अंशांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
PM Kisan: 2 हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत; या मध्ये तुमचा तर समावेश नाही ना ? जाणून घ्या
उत्तर राजस्थानमध्ये थंडीची तीव्र लाट
उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याने पारा शून्य अंशांच्या खाली घसरला आहे. गुरुवारी (ता. ५) उत्तर राजस्थानमधील चुरू आणि सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Published on: 06 January 2023, 07:43 IST