Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत असल्याने राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.
मोठी बातमी : भाजप नेत्याच्याच सहकारी साखर कारखान्यावर छापा
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा खिसा पुन्हा भरणार! आता महागाई भत्ता एवढ्याने वाढणार
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
Published on: 13 April 2023, 02:53 IST