गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागतं असल्याने शेतकरी बांधव पुरता कोलमडला आहे. मात्र अशा विपरीत परिस्थिती मध्ये देखील काही शेतकरी आपली एक वेगळी छाप सोडत आहेत. शेती मध्ये काळाच्या ओघात बदल करत चांगली बक्कळ कमाई करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका डॉक्टराने देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात आधुनिकतेची कास धरत चांगली बक्कळ कमाई केली आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या डॉक्टर रामकृष्ण लोंढे यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत शेतीमध्ये लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. डॉक्टर रामकृष्ण यांनी आपल्या केवळ एक एकर क्षेत्रात टरबूज लागवड करून तीन लाख रुपये कमविले आहेत. निश्चितच अल्प कालावधीत लाखों रुपये उत्पन्न कमवून डॉक्टरांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
कळंब शहरालागत डॉक्टर रामकृष्ण यांनी मांगवडगाव येथे 45 गुंठ्यात कलिंगड लागवड केली. कलिंगड पीक लागवड करण्यासाठी मल्चिंग पेपर अंथरले आणि ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. 18 जानेवारी रोजी डॉक्टर यांनी कलिंगडचे बियाणे टोकन पद्धतीने लावले.
कलिंगड लावल्यानंतर वेळोवेळी आवश्यक खतांची पूर्तता करण्यात आली. किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी तसेच बुरशीनाशकांची फवारणी करण्यात आली. योग्य नियोजन करून अवघ्या 75 दिवसात डॉक्टर रामकृष्ण यांनी टरबूज पिकातून चांगले उत्पादन मिळवले.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी डॉक्टर राम कृष्ण यांच्या टरबुज पिकाची हार्वेस्टिंग सुरू झाली. यातून त्यांना 40 टन माल प्राप्त झाला. या 40 टनापैकी चांगला दर्जाचा माल 30 टन होता त्याला साडे नऊ रुपये प्रति किलो असा दर मिळाला. उर्वरित दहा टन मालाला पाच रुपये किलो असा दर मिळाला. विशेष म्हणजे टरबुजाची खरेदी बांधावरच झाल्याने डॉक्टर यांना चांगला नफा मिळाला आहे. निश्चितच रामकृष्ण डॉक्टर यांची ही कामगिरी पूर्णवेळ काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लाजवणारी आहे.
Published on: 07 May 2022, 01:49 IST