सध्या शेतकरी अनेक वेगवेगळे प्रयोग करून शेतात पैसे कमवत आहेत. कोरोना काळानंतर शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. असे असताना आता जामताडा जिल्हा अम्बा गावात राहणारे अरींदम चक्रवर्ती आणि अनिमेष चक्रवर्ती यांनी आपल्या बगीच्यात मियाजाकी प्रजातीचे सात झालं लावली. त्यापैकी तीन झाडांना फळं लागली आहेत.
सध्या या शेतामध्ये अनेक शेतकरी हे भेटी देत आहेत. यामुळे याचे चांगले फायदे त्यांना समजत आहेत. जामताडा जिल्हा सध्या वेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या लागवडीमुळे चर्चेत आहे. याठिकाणी सर्वात महाग जातीचे आंबे येथे लागले आहेत. या आंब्याची किंमत हजारात नाही, तर लाखात आहे. ही आंब्याची दुर्मिळ प्रजाती आहे, हे याचे वैशिष्ठ आहे.
या जातीचं नाव आहे मियाजाकी. या शेतीची सुरुवात जपानमध्ये झाली होती. परंतु, आता जामताडाच्या दोन भावांनी या प्रजातीच्या आंब्याची लागवड केली. यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मियाजाकीच्या एक किलो आंब्याची किंमत २ लाख ७० हजार रुपये आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे मियाजाकीला एग ऑफ सन म्हणतात.
राज्यात लम्पीचीही दुसरी लाट! शेतकरी चिंतेत, लसीकरण करून घेण्याचे आवाहन
खूप गोड, सोनेरी लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे. एका आंब्याची किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे. झारखंड विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो म्हणाले, या दोन्ही भावांनी दुर्मिळ आंब्याची लागवड करून या परिसरात नाव कमावले आहे. राज्यातील इतर शेतकऱ्यांनी असे प्रयोग करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
यंदा राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी येणार, पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज आला समोर..
अरींदम, अनिमेष यांचा बगीचा पाहण्यासाठी लोगं दूरदूरून येतात. ते आंब्याची शेती कशी करतात, याचे मार्गदर्शनही करत आहेत. यात प्रामुख्याने अल्फांसो, आईवेरी, बनाना मँगो, पोटल मँगो यासारख्या प्रजाती आहेत.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांची कृषी जागरणाला भेट, म्हणाले, निसर्ग कधीही विश्वासघात करत नाही
आता स्वयंपाकघरातून पिवळी मसूर गायब होणार, किमती झपाट्याने वाढल्या
पिकांची मशागत सोडा, आता गांडुळाच्या शेतीतून लाखो रुपये कमवा, जाणून घ्या कसे..
Published on: 23 May 2023, 02:48 IST