Success Stories

काल शेतकऱ्यांचा आणि बैलांसाठीचा एक महत्त्वाचा दिवस होता. पश्चिम महाराष्ट्रात काल बेंदूर (Bendur) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. बैलांच्या प्रति आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची खास ओळख आहे. इस्लामपूरमधील राजाराम बापू इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आरआयटीमधील काही विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी हे यंत्र तयार केले आहे.

Updated on 13 July, 2022 10:01 AM IST

शेतकरी आपल्या प्राणी मित्रांवर खूप प्रेम करत असतो. अनेकदा ते आपण बघितले आहे. काल शेतकऱ्यांचा आणि बैलांसाठीचा एक महत्त्वाचा दिवस होता. पश्चिम महाराष्ट्रात काल बेंदूर (Bendur) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. बैलांच्या प्रति आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची खास ओळख आहे. या दिवशी बैलाकडून काहीही काम करून घेतले जात नाही. त्याला रंग लावून सजवून गावातून मिरवणूक काढली जाते.

असे असताना इस्लामपूरमधील राजाराम बापू इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आरआयटीमधील काही विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच याचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचा एक प्रयोग केला आहे. त्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी हे यंत्र तयार केले आहे.

या संशोधक विद्यार्थ्यांनी 'सारथी' या नावाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यांनी या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटंट मिळविण्यासाठी अर्ज देखील केला गेला आहे. यामुळे ते बैलांना फायदेशीर ठरले तर याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.

लेट पण थेट! दमदार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग वाढवला

भारतात आधुनिकीकरण झाले असले तरी बैलांचे मोठे महत्त्व आहे. त्यांचा मोठा सन्मान केला जातो. यामुळे बेंदूर सण तर बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच साजरा केला जातो. शेतीमध्ये राबणाऱ्या आणि ऊस वाहतूक करताना प्रचंड ओझे सहन करावे लागणाऱ्या बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला तर खूपच जास्त आनंद सर्वांना होईल, आणि बैलांच्या वेदना कमी होतील.

धक्कादायक! मगरीने आठ वर्षांच्या मुलाला गिळले, पोटात मुलगा जिवंत असेल म्हणून..

दरम्यान, शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांना खास बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट तयार केले. महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. ऊस वाहतूक करताना मोठ्या प्रमाणावर आजही बैलगाडीचा वापर केला जातो. यामुळे याचा मोठा उपयोग होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही आणि अतिवृष्टी झाल्यास अनुदानही, शेतकऱ्यांना सुखद धक्का
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'

English Summary: true gratitude Bendur festival unique jugaad created alleviate suffering bulls
Published on: 13 July 2022, 10:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)