Success Stories

असा एक तरुण ज्याचे शिक्षण बीएस्सी अॅग्री आणि पुण्यातील कृषी आयुक्तालयात त्याला चांगल्या पदावर नोकरी सुद्धा लाभलेली जे की प्रति महा त्याला ७० हजार रुपये पगार सुद्धा होता मात्र त्या तरुणाने ७० हजार रुपयांची नोकरी सोडली आणि आपला मान शेतीकडे ओळवली.सध्या तो प्रति महा ९ लाख रुपये कमवत आहे. आज आपण या तरुणाचा आपल्याला थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत.

Updated on 09 September, 2021 7:36 AM IST

भोसे येथील तरुणाचा थक्क करणारा प्रवास:

शशिकांत भरत शिंदे या तरुणाने नाव आहे जे की याचे वय सध्या ३९ आहे. शशिकांत शिंदे हे पाथर्डी तालुक्यातील भोसे या गावात(village) राहतात. शशिकांत शिंदे यांचे शिक्षण बीएस्सी अॅग्री झालेले आहे. शशिकांत याना कृषी आयुक्तालय पुणे(pune) मध्ये ७० हजार रुपये पगार असणारी चांगली नोकरी सुद्धा होती मात्र त्यांनी ती नोकरी सोडली.शशिकांत यांनी आपल्या वडिलोपार्जित राखलेली १६ एकर जमीन होती जे की या जमिनीत त्यांनी बाजरी, गहू, ज्वारी तसेच हरभरा ही पारंपारिक पिके न लावता त्यामध्ये फळबाग ची लागवड केली.त्यांनी  या मध्ये फक्त एकच प्रकारची झाडे नाही तर योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांनी फळझाडे लावली. जसे की ५ एकर क्षेत्रात डाळिंब  बाग, पाच  एकर क्षेत्रात संत्रा बाग  आणि पाच एकर  क्षेत्रात सीताफळाची बाग आणि जे राहिलेलं १ एकर होते त्या वर १ कोटी लिटर पाणी साचले एवढे मोठे शेततळे काढले आहे. त्यांच्या पाच एकर जमिनीमध्ये जवळपास ३ हजार डाळिंब फळाच्या झाडाची लागवड केलेली आहे.

हेही वाचा:मोहरी आणि गव्हाच्या हमी भावात वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शशिकांत शिंदे यांनी गेल्या वर्षी डाळींबाच्या बागेतून जवळपास ७० टन एवढे उत्पन्न काढले जे की फक्त त्याचे ५८ लाळ रुपये आले होते. तसेच यावर्षी सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन निघणार आहे जे की माल जास्तच आहे मात्र त्यांनी सरासरी ७० टन गृहीत धरलेला आहे.सध्या डाळिंबाचा दर ११५ रुपये प्रति किलो आहे. यावर्षी सुमारे  शशिकांत  शिंदे  यांना  ७० टन  डाळिंबाचे जवळपास ७० लाख रुपये भेटणार आहेत त्यामधून पाच लाख रुपये गेलेला खर्च जर बाजूला काढला तर निव्वळ त्यांच्या हातात ६५ लाख रुपये येणार आहे. 

संत्रा  या फळाची  त्यांच्या शेतात ८०० झाडे लावलेली आहेत, ज्याचे मागच्या वर्षी ५० टन माल निघालेला होता आणि त्याला भाव प्रति किलो ३८ रुपये ने आला. त्यांना त्या ५० टन  संत्राचे पैसे १९  लाख रुपये  मिळाले आणि त्यामधून लागणार खर्च जर वजा केला तर त्यामधून त्यांना १३ लाख रुपये प्रति वर्ष भेटतात.तसेच त्यांनी गोल्डन सीताफळ लावलेले आहे त्यामधून सुद्धा त्यांना वर्षाकाठी १३ लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यांनी त्यांच्या शेतीत योग्य प्रकारे नियोजन केले असल्यामुळे वर्षात जवळपास त्यांना १ कोटी रुपये उत्पन्न भेटते.

७० हजाराची नोकरी तर सोडली मात्र महिन्याला ९ लाख रूपये उत्पन्न:

शशिकांत शिंदे हे वर्षातून फक्त एक पीक धरतात. संत्रा या पिकाला कष्ट कमी असते मात्र त्याला पाण्याची गरज जास्त लागते. पाथर्डी हा भाग म्हणजे कमी पाण्याचा भाग आणि तिथे जी कमी पाण्यात पिके येतात त्यांना पसंदी दिली जाते.मग शशिकांत शिंदे यांनी डाळिंब च्या बागेला पसंदी दिली. शेतीच्या कामात त्यांना त्यांचा भाऊ तसेच वडील सुद्धा मदत करतात. काही जास्त गरज असेल तर ते शेतात मजूर लावतात नाहीतर ते स्वतः च बागेकडे लक्ष देतात.

English Summary: This young man is leaving his job and earning in Lakhs
Published on: 09 September 2021, 07:35 IST