शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देणे अनिवार्य ठरले आहे. पारंपारिक पिकासाठी लागणारा उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण होत असल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला येत आहे.
मात्र, जर शेती मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले, पारंपरिक पिकाला फाटा देत नगदी पिकांची (Cash Crop) लागवड केली तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून.
जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या नंदी हत्तरगा येथील नवयुवक शेतकरी विरेश खोबरे यांनी सोयाबीन हरभरा मूग उडीद यांसारख्या पारंपरिक पिकांची शेती करण्याऐवजी जिरेनियम या (Geranium Cultivation) औषधी वनस्पती (Medicinal Plant) च्या लागवडीचा विचार केला.
या नवयुवकाने जिरेनियमची लागवड केली आणि आज लाखो रुपयांची कमाई करत आहे. वीरेश एक सरकारी नोकरदार होते, बीए बीएड केल्यानंतर त्यांना मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लागली होती. मर्चंट नेव्ही मध्ये या शेतकरी पुत्राचे मन काही रमले नाही. शेवटी त्यांनी गावाकडे परत येण्याचा विचार केला.
शेती करत असताना वीरेश यांना जाणवले की पारंपारिक पिकातून उत्पादन खर्च काढणे देखील मोठे मुश्कील आहे. यामुळे विरेश यांनी पारंपरिक पिकाला फाटा देण्याचे ठरवले, आणि बारामती पुणे जेजुरी तेथील जिरेनियम उत्पादक शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी खर्च केला.
सहा महिने जिरेनियम शेतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर वीरेश यांनी पुण्यातून दहा रुपये प्रति नग याप्रमाणे दहा हजार जिरेनियमची रोपे मागविले. एक एकर क्षेत्रात एवढ्या रोपांची लागवड झाली लागवडीसाठी त्यांना जवळपास 70 हजार रुपये खर्च आला. अर्धा एकर क्षेत्राच्या जिरेनियम पिकातून त्यांना सात टन पाला प्राप्त झाला.
या एवढ्या पाल्यापासून त्यांना सात किलो युरेनियम चे तेल प्राप्त झाले, जिरेनियम चे तेल खूप महागडी विकले जाते त्यांना या सात किलो तेलातून 90 हजारांची कमाई झाली. म्हणजे बारा हजार पाचशे रुपये प्रति किलो असा जिरेनियम तेलाला भाव मिळाला. अर्धा एकरात असलेले जिरेनियम पासून रोपांची निर्मिती केली आणि सहा रुपये नग याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात विक्री केली.
यातून देखील त्यांना चांगला मोठा नफा मिळाला तेलातून आणि रोप विक्रीतून त्यांना तीन ते चार लाख रुपये मिळाले. वीरेश यांना जिरेनियमच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात जिरेनियम ची शेती आता बघायला मिळत आहे.
या शेतकऱ्यांना तेल काढण्यासाठी गैरसोय होऊ नये या हेतूने सुरेश यांनी 15 लाख रुपये खर्च करून जिरेनियम तेल तयार करण्याचा प्लांट उभारला आहे. वीरेश यांनी जिरेनियमचा पाला सात हजार रुपये टन आपण शेतकऱ्यांकडून खरेदी करु असे देखील यावेळी सांगितले.
हेही वाचा:-लई भारी! 'या' शेतकऱ्याने डाळिंब बागात घेतले कांद्याचे आंतरपीक; आणि…….!
Published on: 17 March 2022, 09:43 IST