राज्यातील शेतकरी बांधव सध्या बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत. हा बदल शेतकरी बांधवांसाठी खूपच फायद्याचा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. जे विकले जाते तेच शेतकरी बांधव पिकवत असल्याने त्याला लाखो रुपयाचा फायदा होत आहे. जे विकेल तेच पिकवेल या धोरणाचा अवलंब करत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्या एका शेतकऱ्याने लाखों रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
तालुक्यातील नेहरूनगर येथील नामदेव शंकर पवार यांनी आपल्या दहा गुंठे क्षेत्रात टोमॅटो पिकाची लागवड केली. सध्या बाजारपेठेत टोमॅटोला मागणी असल्याने त्यांनी या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नामदेव यांना केवळ दहा गुंठे क्षेत्रातून 1 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे नामदेव यांनी ज्या शेतात टोमॅटोची लागवड केली ती शेत जमीन पडीक होती. पडीक जमिनीत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्याने पंचक्रोशीत नामदेव यांचे कौतुक केले जात आहे.
नामदेव उच्चविद्याविभूषित आहेत त्यांनी एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्चविद्याविभूषित असूनही शेतीवरचे त्यांचे प्रेम कमी झाले नाही त्यामुळे त्यांनी नोकरीऐवजी शेती करणेच पसंत केले. नामदेव यांनी आपल्या माळरान जमिनीवर माती टाकून एकूण 19 गुंठे क्षेत्रापैकी दहा गुंठे क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली. नामदेव यांनी दहा गुंठे क्षेत्रात सुमारे बावीसशे टोमॅटो रोपांची लागवड केली.
टोमॅटो व्यतिरिक्त बाकी शिल्लक असलेल्या जमिनीत वांगी मिरची काकडी या भाजीपाला वर्गीय पिकांची देखील लागवड केली. बाजारात ज्या शेतमालाला योग्य भाव मिळतो त्याच पिकाची लागवड करण्याचा नामदेव यांचा मास्टर प्लॅन आता सक्सेस झाल्याचे सांगितले जात आहे.
टोमॅटो,वांगी,काकडी या पिकाला येत्या काही दिवसात मोठी मागणी असेल असा नामदेव यांचा अंदाज आहे. अजून एका पंधरवाड्यात नामदेव यांचे टोमॅटो विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होणार आहे. एका झाडाला साधारणता पाच किलोच्या आसपास टोमॅटो लगडलेले आहेत.
सध्या टोमॅटोला दहा रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे म्हणजेच टोमॅटोच्या बावीसशे झाडांच्या प्लॉटमधून त्यांना एक लाख दहा हजार रुपये उत्पन्न प्राप्त होईल असा अंदाज आहे. शिवाय येत्या काही दिवसात संपूर्ण देशात रमजानचा पवित्र सण येणार आहे. या सणाला तसेच उन्हाळ्यात नेहमीच वांगी काकडी आणि टोमॅटो, मिरची यांना अधिकचा दर मिळत असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची नामदेव यांना शाश्वती आहे.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Published on: 21 March 2022, 10:43 IST